लोकसभा निवडणुकीत देशभरातील मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदान करता आलेले नाही. या प्रकरणी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने जाहीर माफी मागितली आहे.
निवडणूक आयुक्त एच.एस.ब्रम्हा यांनी मतदान करू न शकलेल्यांची माफी मागितली असून येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्ष घालून प्रक्रिया सुधारण्यात येईल असेही सांगितले आहे. एच.एस.ब्रम्हा म्हणाले की, “इतक्या प्रचंड संख्येने मतदारांची नावे नसणे ही मोठी चूक आहे. त्यांची नावे कशी गायब झाली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक टप्प्यावर व्यवस्थापनाचा अभाव असावा त्यामुळे हा घोळ झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी तातडीने पावले उचलण्यात येतील.” असेही ब्रम्हा पुढे म्हणाले.