बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी आपली मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली असून ४५ गाई आणि २० वासरे यांच्याह ही मालमत्ता साडेसहा कोटींची आहे. तसेच आपल्याकडे ५० काडतुसांसह एक बंदूकही असल्याचे राबडीदेवी यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे एप्रिल २०१२मध्ये बिहार विधान परिषदेसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात राबडींनी आपल्याकडे ३७ वासरे असल्याचा उल्लेख केला होता. तर त्या वेळी राबडीदेवींची मालमत्ता ३ कोटी ६५ लाख असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे अवघ्या दोन वर्षांत त्यांची मालमत्ता दुप्पट झाली आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न १७ लाख १५ हजार रुपये तर लालूप्रसाद यांचे ९ लाख आहे. त्यांच्याकडे ४७२ ग्रॅमचे तर लालूंकडे केवळ ५० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.