दिवंगत केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री व महाराष्ट्राचे झुंजार नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती हा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
मुंडे पंचत्वात विलीन
मुंडे महाराष्ट्र भाजपचे लोकनेते होते. विधानसभा निवडणुकीत तेच भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. अशा, भाजपचा बहुजन चेहरा असलेल्या नेत्याच्या अंत्यविधीला पंतप्रधान मोदी अनुपस्थित राहिल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाली असून, माजी मुख्यमंत्री व दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अंत्यसंस्कारांसाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहिल्या होत्या, या घटनेची आठवण यानिमित्ताने काढण्यात येत आहे.
या भावनांचे करायचे काय?
विलासराव देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तो स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट २०१२) होता. तरीही पंतप्रधान दिल्लीतील ध्वजारोहण आटोपून तडक अंत्यसंस्कारांसाठी बाभळगावला रवाना झाले होते.
लोकनेत्याच्या अंत्यविधीला लोकरोषाचे गालबोट..
लोकसभेत बुधवारचा दिवस नियमित कामकाजाचा होता. परंतु मुंडे यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह निवडक नेत्यांनी कामकाज तहकूब झाल्यानंतर लगेचच विशेष विमानाने परळी गाठली.  मोदींनी मात्र दिवसभर नियोजित भेटीगाठी घेतल्या. सायंकाळी सहा वाजता त्यांनी मंत्रालयांच्या सचिवांशी चर्चा केली. मोदी व मुंडे यांचे अत्यंत सौहार्दाचे संबंध होते. त्या पाश्र्वभूमीवर मोदींचे अंत्यसंस्कारास न जाणे हे येथील राजकीय वर्तुळात अनेकांना खटकले.
अडवाणी, राजनाथ, सुषमा परळीहून तातडीने दिल्लीकडे
लोकसभेत मुंडे यांना श्रद्धांजली
मुंडेंच्या खात्यांचा पदभार तात्पुरता गडकरींकडे

..तर गोपीनाथ मुंडे यांचे प्राण वाचले असते