• जमीन – खरीप ज्वारी लागवडीसाठी मध्यम प्रतीची, निचरा होणारी, चिकन, पोयटय़ाची, मध्यम काळी व तांबडी जमीनही अत्यंत फायद्याची ठरते.
  • पूर्व मशागत – हिवाळ्यात किंवा पूर्वीचे पीक निघाल्यावर लगेच जमिनीची नांगरट करतात. तीन-चार वेळा कुळवणी करून तण धसकटे वेचून काढतात. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी १२ ते १५ गाडय़ा शेणखत जमिनीत मिसळले जाते. त्यामुळे उत्पादन वाढवण्यात मदत होते.
  • पेरणी – जून-जुलैचा पहिला आठवडा पेरणीस योग्य ठरतो. चांगला पाऊस होऊन वापसा येताच पेरणी करणे योग्य ठरते. पाणी मुबलक प्रमाणात असल्यास शेवटच्या आठवडय़ातही पेरणी केली जाते. पेरणीचे अंतर ४५ ते १५ सें. मी. इतके असते.
  • जाती – संकरीत वाणांत सीएसएच १, ५, ६ व ९ या जाती महत्त्वाच्या आहेत. सीएसएच १०, ११, १४, १६ या ज्वारीच्या नव्या जातीही हल्ली प्रचलित आहेत. विदर्भासाठी एसपीएच ३८८ ही संकरित जात उत्तम ठरते. इतर सुधारित जाती एसपीव्ही ३४६, ३५१, ४६२, ४७५ व ९४६ या होत. या जाती मध्यम उंचीच्या असून त्या ११० ते १२० दिवसांत तयार होतात.
  • बियाणे प्रमाण – हेक्टरी १० किलो या प्रमाणात वापरले जाते.
  • रासायनिक खते – हेक्टरी ८० ते १०० किलो नत्र, स्फुरद व पालाश द्यावे लागते. नत्राची अर्धी मात्रा, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी देतात.
  • उत्पादक राज्ये – महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाना.

Vasundhara Day, Yavatmal,
‘वसुंधरा दिवस’ साजरा होत असताना यवतमाळात ४० वृक्षांची कत्तल! विश्रामगृहात विनापरवानगी वृक्षतोड
Heat wave again in Vidarbha Akola recorded the highest temperature on Friday
विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट? जाणून घ्या, अकोल्यात पारा कुठे पोहचला
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना