शासन आणि सेवाभावी संस्था व लोकसहभागाच्या माध्यमातून गावच्या शिवारात तब्बल पाच साखळे बंधारे, िबदुसरा नदीचे खोलीकरण करून तब्बल पाचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आणून गावचा शिवार खऱ्या अर्थाने जलयुक्त केला. परिणामी शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले असून शिवार हिरवागार झाला. एक तरुण गावाला पाण्यासाठी स्वयंपूर्ण करतो हे स्वप्नवत वाटणारे काम बीड शहरापासून केवळ आठ कि. मी. अंतरावर असलेले चारशे उंबऱ्याचे लोळदगावच्या शिवराम घोडके याने प्रत्यक्षात करून दाखवले आहे. 

दहा वर्षांपूर्वी परदेशी नोकरी सोडून गावात परतलेल्या उच्चशिक्षित शिवराम घोडके या तरुणाने हिवरेबाजारच्या धर्तीवर गाव पाणीदार करण्याचा निश्चय केला. शेतीत सेंद्रिय पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग करत इतर शेतकऱ्यांना एकत्र करून शेती विषमुक्त करण्यात यश मिळवले. शासन आणि सेवाभावी संस्था व लोकसहभागाच्या माध्यमातून गावच्या शिवारात तब्बल पाच साखळे बंधारे, िबदुसरा नदीचे खोलीकरण करून तब्बल पाचशे हेक्टर जमीन ओलिताखाली आणून गावचा शिवार खऱ्या अर्थाने जलयुक्त केला. परिणामी शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले असून शिवार हिरवागार झाला. एक तरुण गावाला पाण्यासाठी स्वयंपूर्ण करतो हे स्वप्नवत वाटणारे काम शिवरामने प्रत्यक्षात करून दाखवले आहे.

बीड शहरापासून केवळ आठ कि. मी. अंतरावर असलेल्या चारशे उंबऱ्याचे आणि दीड हजार लोकसंख्येचे लोळदगाव, इतर गावांप्रमाणेच सर्वसामान्य. पारंपरिक शेती, पीक पद्धतीही तीच. पाणी टंचाईही पाचवीला आणि कुरघोडय़ांचे राजकारण तर अंगवळणी. गावाला सव्वापाचशे हेक्टरचा शिवार असला तरी केवळ पन्नास हेक्टर जमिनीलाच कुठे विहिरीतून कोठे बोअरमधून तर कोठे नदीतून पाणी. त्यामुळे कडधान्य आणि नगदी पिकांवरच इथली शेती. दहा वर्षांपूर्वी याच गावातील शिवराम घोडके नावाचा तरुण उच्चशिक्षित झाला. परदेशी नोकरीची संधीही मिळाली. मात्र हिवरेबाजारसारखा आपला गाव बदलता येईल ही इच्छा मनात घेऊन गावात परतला आणि शेतीत रमला. एकविसाव्या शतकात सर्वजण नोकरीच्या मागे धावत असताना शिवरामची कथा ही स्वप्नवत वाटेल अशीच आहे. सुरुवातीला स्वतच्या शेतीत नवीन प्रयोग करून शिवरामने कामधेनू सिद्धी ३ हे सेंद्रीय खत विकसित केले. स्वतबरोबर जवळच्या शेतकऱ्यांना आधुनिक आणि सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शिवरामला वेडय़ात काढणारे शेतकरी हळूहळू शिवरामबरोबर जोडले गेले आणि सेंद्रिय शेतीला गावात चांगला प्रतिसाद मिळाला.

गावात बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे या शेतकऱ्यांना पाणी मिळाल्याशिवाय त्यांची आíथक प्रगती होऊ शकत नाही. हे जाणून शिवरामने गावाच्या परिसरात पाण्यावर काम करण्यास सुरुवात केली. पोपट पवार यांनी पाण्याच्या माध्यमातूनच हिवरेबाजार सधन केले. त्याच धर्तीवर आपले गावही पाणीदार झाले पाहिजे यासाठी गावाच्या परिसरातील नद्या नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण करून पाण्याची उपलब्धता करण्यावर भर दिला. मागच्या उन्हाळ्यात जलयुक्त शिवार व लोकसहभागातून गावात पाच साखळी बंधारे मंजूर केल्याने गावचा शिवार पाण्याखाली आला. एका बंधाऱ्याची साठवण क्षमता आठ टीएमसी असल्याने अशा पाच बंधाऱ्यांतून चाळीस टीएमसी पाणी साठले आहे. तर िबदुसरा नदीच्या पात्रात खोलीकरण करून नऊशे टीएमसी पाण्याची साठवण निर्माण झाल्याने लोळदगावचा ५०३ हेक्टरचा शिवार जलयुक्त झाला. परिसरातील अनेक गावातील शिवारांनाही याचा मोठा फायदा झाला.

गावातील शंभर टक्के शेती ओलिताखाली आल्याने गावाला आता आíथक समृद्धी येऊ लागली आहे. आता गावचे दरडोई उत्पन्न वीस हजार रुपयांपर्यंत वाढले असल्याचा दावाही केला जात आहे. तर शेतामधील वेगवेगळ्या प्रयोगांमुळे आणि रासायनिक खतांचा वापर बंद केल्यामुळे या गावातील शेती विषमुक्त झाली आहे. आता शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा ही पीके मोठय़ा प्रमाणात घेतात. तर काही शेतकरी पालेभाज्या करून शहरात दररोज विक्रीसाठी आणतात. गावात नोकरदारांची संख्या नाममात्र आहे. मात्र परिसरात पाण्याने समृध्दी आणली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारीही शिवरामकडे देण्यात आली आहे. ‘नाम’च्या माध्यमातून गावाच्या परिसरात नद्यांच्या खोलीकरणाचे मोठे काम करण्यात आले. गावाला पाणीदार करण्याबरोबरच दहा वर्षांत शिवरामने गाव तंटामुक्त करण्यातही यश मिळवले आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडली जाते.

जिल्हा परिषदेच्या शाळेचे स्वरूप बदलण्यात आले. गावातील घरांच्या िभतीवर स्वच्छतेचे सुविचार, निरोगी जगण्याचा मंत्र देण्यात आला आहे. त्यामुळे लोळदगावची सेंद्रिय शेती पाहण्यासाठी अनेक ठिकाणच्या लोकांचे पाय गावाकडे वळले आहेत. एक तरुण परदेशातील नोकरी सोडून गावाला दहा वर्षांत पाणीदार करू शकतो, हे शिवरामने मोठय़ा

कष्टातून आणि प्रयत्नातून सिद्ध केले आहे. शिवरामच्या कृषी क्षेत्रातील नवीन प्रयोगासाठी शासनाने कृषिभूषण पुरस्कार देऊनही गौरविले आहे. तर इतर संस्थांनीही त्यांच्या कामाची दखल घेऊन सन्मानित केले. दरवर्षी शेकडो शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे देत पाणी आणि शेती यातच खरा विकास दडला असल्याने तो उघडून दाखवण्यासाठी शिवरामने आपले कसब पणाला लावून यशस्वी केले आहे.

vasantmunde@yahoo.co.in