मेष नवीन वर्षांमध्ये शनी अष्टमस्थानातून भाग्यस्थानात जाणार आहे. या शनीने तुमची बरीच गरसोय केली. अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्न निर्माण केले. ते सोडविण्यामध्ये तुमचा बराच वेळ आणि शक्ती खर्च झाली. आता शनी भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल. मात्र गुरू षष्ठस्थानात जाणार आहे. त्यामुळे आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नका म्हणजे सर्व काही ठीक होईल.

व्यापार-उद्योगात येत्या वर्षांत खट्टा-मीठा असा अनुभव येईल. खर्च कमी झाल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. जुनी कोर्ट प्रकरणे किंवा इतर गुंतागुंतीचे प्रश्न फेब्रुवारीमध्ये मार्गी लागायला लागतील. पण अपेक्षित यशासाठी तुम्हाला ऑक्टोबपर्यंत थांबावे लागेल. जानेवारी-मार्च हा कालावधी प्राप्तीच्या दृष्टीने चांगला आहे. काही जुनी कर्जे फेडू शकाल. तुमचे धोरण सबुरीचे ठेवा.

नोकरदार व्यक्तींना फेब्रुवारीपर्यंत मान मोडून काम करावे लागेल, पण कामामधला तणाव कमी होईल. बदली हवी असेल तर जानेवारीपर्यंत प्रयत्न करावा. पुन्हा एकदा एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत भरपूर काम झाल्यामुळे बरे वाटेल. ऑगस्टनंतर एखादे जुने प्रकरण त्रासदायक ठरेल.

गृहसौख्याचा विचार केला तर ‘मान तर समाधान’ असा प्रकार असेल, कुटुंबातील काही जुने प्रश्न आटोक्यात येतील. फेब्रुवारीनंतर त्यावर तोडगा शोधता येईल. आपुलकीच्या व्यक्तींची आणि मुलांची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ची प्रकृती सांभाळा. नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना अंथरूण पाहून पाय पसरा. नातेवाईकांच्या फार जवळ जाऊ नका.

महिलांना घरामधल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सतत दक्ष राहावे लागेल. मधूनच प्रियजनांची काळजी वाटेल. विद्यार्थ्यांना ग्रहांची फारशी साथ नाही. त्यांनी बेसावध न राहता त्यांचे कष्ट वाढविणे चांगले. कलाकार आणि खेळाडूंना फेब्रुवारी आणि मार्चनंतर त्यांचे प्रावीण्य दाखवायला चांगली संधी मिळेल. त्याचा त्यांना फायदा उठवावा लागेल. अतिश्रम आणि मानसिक तणाव सहन होणार नाही.

वृषभ गुरू आणि शनी हे दोन्ही ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे नवीन वर्षांची सुरुवात धुमधडाक्यात होईल. या वर्षांमध्ये खूप काम करायचे असे तुम्ही ठरवाल. पण ग्रहमान असे दाखविते की काहीही अनपेक्षित प्रश्नांमुळे तुम्हाला थोडेसे मागे खेचल्यासारखे वाटेल. पंचमस्थानामधला गुरू उत्तम मनोधर्य देईल. त्या जोरावर प्रगती करता येईल. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा.

व्यापार-उद्योगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे तुम्हाला वाटेल. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत तुम्ही मोठय़ा जोशात काम कराल. त्यानंतर मात्र सभोवतालचे वातावरण अचानक बदलणार आहे. बाजारातील परिस्थिती, सरकारी धोरणे स्पर्धक यामुळे काही पेचप्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी तुमचे धोरण सावध ठेवा. पशाची आवक गरजेनुसार राहील, पण पसे शिल्लक पडणार नाहीत.

नोकरदार व्यक्तींना फेब्रुवारी-मार्चपूर्वी एखादी चांगली संधी मिळेल. त्यानंतर मे-जुल या दरम्यान चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. काही जणांना थोडय़ा अवधीकरिता परदेशात जाता येईल. फेब्रुवारीनंतर अतिमहत्त्वाकांक्षेपोटी नोकरीत बदल करावेसे वाटतील, पण त्यामध्ये फसगत होण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. एकंदरीत सुख-दु:खाचा वाटा समसमान असेल.

गृहसौख्याच्या दृष्टीने पंचमस्थानातील गुरूचे भ्रमण चांगले आहे. जानेवारीपर्यंत एखादे लांबलेले कार्य निश्चित होईल. त्यामुळे दिलासा वाटेल. तरुणांनी धरसोड करू नये. म्हणजे स्थिरता लाभेल. शक्यतो नवीन प्रॉपर्टी खरेदी न करता जी आपल्याकडे आहे त्यावर समाधान मानावे. अतिपशाचा आणि अधिकाराचा मोह टाळावा. फेब्रुवारी ते ऑक्टोबर यादरम्यान एखादी नतिक जबाबदारी पार पाडावी लागेल.

विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. अभ्यासाच्या प्रमाणात मार्क मिळतील. कलाकार आणि खेळाडूंनी स्पर्धकांना कमी लेखू नये. त्यांनी त्यांची तयारी वाढवावी. महिलांना कर्तव्य आणि मौजमजा यामध्ये कर्तव्याला महत्त्व द्यावे.

मिथुन येत्या वर्षांत आठ महिने मंगळ शनीसमवेत षष्ठमस्थानात होता. त्याने अनेक प्रश्न निर्माण केले. त्यातून कधी एकदा सुटका होते याची तुम्ही वाट पाहात होतात. एकंदरीत कामकाज चांगले होते, पण व्यक्तिगत जीवनात काही समस्या तुम्हाला भेडसावत होत्या. शिवाय प्रकृतीचीसुद्धा फारशी साथ नव्हती. आता या ग्रहस्थितीतून तुमची हळूहळू सुटका होणार आहे. हीच तुमच्या दृष्टीने आनंदाची बातमी आहे.

व्यापार-उद्योगात नवीन वर्षांत तुम्हाला सतर्क राहावे लागेल. बाजारातील स्पर्धा आणि एकंदरीत वातावरण पाहून तुम्हाला तुमचा पवित्रा ठरवावा लागेल. तुमच्या क्षेत्रातील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवातीला भीती वाटेल, पण नंतर तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढाल. जानेवारीपासून तुमच्या कामाला वेग येईल. फेब्रुवारीपासून सप्टेंबपर्यंत चांगले काम झाल्यामुळे तुमची निराशा दूर होईल. प्राप्तीचे प्रमाण वाढल्यामुळे आत्मविश्वास बळावेल. सप्टेंबरनंतर थोडीशी नशिबाची साथ मिळेल, पण त्यावर पूर्णत: अवलंबून राहू नका.

नोकरदार व्यक्तींना या वर्षांत कामाच्या स्वरूपातील बदल स्वीकारावे लागतील. दिवाळीनंतर अचानक वरिष्ठ वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवण्याची शक्यता आहे. ज्यांची पूर्वी परदेशात जाण्याची संधी हुकली होती त्यांना तशी संधी मे-ऑक्टोबर या काळात मिळेल. बढतीची शक्यता जरी कमी असली तरी कामाचा तणाव कमी झाल्याने तुम्ही थोडेसे स्वास्थ्य अनुभवू शकाल. काहींना संस्थेतर्फे नवीन प्रशिक्षण मिळेल.

गृहसौख्याच्या दृष्टीने चतुर्थातील गुरू विशेष अनुकूल आहे. जुन्या प्रश्नासंबंधी काही मामले अर्धवट राहिले असतील, तर फेब्रुवारीनंतर ते मार्गी लागतील. जास्त तणाव न होता योग्य ठिकाणी तडजोड करा. ज्यांना नवीन घर घ्यायचे आहे त्यांना एप्रिल, मे आणि सप्टेंबरनंतरचा कालावधी चांगला आहे. एकंदरीत गृहसौख्यात भर पडेल.

विद्यार्थ्यांनी आळस करू नये. तरुणांना स्थिरता येईल. त्यांचे विवाह जमतील. महिलांचे बराच काळचे स्वप्न साकार झाल्यामुळे त्यांना बरे वाटेल.

कर्क नवीन वर्षांत गुरूची तुम्हाला वर्षभर साथ मिळणार आहे. शनी मात्र फेब्रुवारीनंतर षष्ठमस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे ग्रहमान संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जर प्रकृतीची काळजी घेतलीत तर अनेक गोष्टी तुम्हाला मनाप्रमाणे करता येतील. एकंदरीत प्रगतिकारक ग्रहमान आहे. त्याचा फायदा उठवा.

व्यापार-उद्योगात आíथक परिस्थिती सुधारल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. जानेवारीपासून जूनपर्यंत आता चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन कराल. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान विकत घ्यावेसे वाटेल. फेब्रुवारीनंतर व्यापारातील स्पर्धा जास्त तीव्र होणार आहे हे लक्षात ठेवा. त्यादृष्टीने आवश्यक ते उपाय योजा. पशाची आवक समाधानकारक असल्यामुळे तुम्हाला चिंता राहणार नाही.

नोकरीमध्ये तुमच्या प्रावीण्याला भरपूर वाव असेल. तुमच्या संस्थेमध्ये एखादा नवीन प्रोजेक्ट सुरू होणार असेल, तर त्याकरिता तुमची निवड होईल. कामाचे प्रमाण सतत वाढत राहिल्यामुळे तुम्हाला थोडीही विश्रांती मिळणार नाही. प्रत्यक्ष बढती मिळाली नाही तरी तुमच्या अधिकारामध्ये कामाच्या निमित्ताने वाढ होण्याची शक्यता आहे. काही जणांना जानेवारी ते मे या कालावधीत परदेशी जाता येईल.

गृहसौख्याच्या बाबतीमध्ये तुमची रास अतिशय संवेदनशील आहे. सर्वाना मदत करायची तुमची इच्छा असेल, पण कामाच्या व्यापामुळे तुम्ही ती पूर्ण करू शकणार नाही. सप्टेंबरनंतर काही प्रमाणात यावर तोडगा निघेल. नवीन वास्तूचे स्वप्न पुढील दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. प्रकृतीचे जुने आजार असतील तर मात्र वर्षभर काळजी घ्यावी लागेल.

तरुणांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांना ग्रहांची उत्तम साथ आहे. जेवढा जास्त अभ्यास तेवढे जास्त मार्क असे समीकरण असेल. महिलांना घरामध्ये आणि सामूहिक कामात बरीच मागणी राहील.

सिंह येत्या वर्षांच्या सुरुवातीपासून शनी आणि मंगळ हे दोन ग्रह चतुर्थ स्थानात भ्रमण करत होते. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. व्यावसायिक पातळीवर सर्व काही ठीक होते, पण अचानक होणाऱ्या बदलांमुळे घरामध्ये म्हणावे तसे स्वास्थ्य मिळाले नाही. नवीन वर्षांत गुरूची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. शनीही राशीबदल करून पंचम स्थानात येणार आहे. हे बदलणारे ग्रहमान तुमच्या प्रगतीला पूरक आहे.

व्यापार-उद्योगात आíथकदृष्टय़ा चांगली प्रगती करण्याचे तुमचे स्वप्न असेल. त्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी दिवाळीनंतर सुरू होतील. त्याचा फायदा तुम्हाला जानेवारीपासून मिळायला सुरुवात होईल. फेब्रुवारीनंतर एखादे मोठे उद्दिष्ट मनात ठेवाल. मार्च ते जून हा कालावधी तुम्हाला लाभदायक ठरेल. जुल ते ऑक्टोबर दरम्यान हे ग्रहमान संमिश्र आहे.

नोकरीच्या ठिकाणी तुम्ही चांगले काम केल्यामुळे वरिष्ठांच्या बऱ्याच अपेक्षा असतील. दिवाळीपासून डिसेंबपर्यंतचा कालावधी थोडासा गरसोयीचा आणि कष्टदायक आहे. फेब्रुवारीनंतर तुमच्या कामाला गती येईल. एप्रिल ते मेच्या सुमारास अधिकारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा एखादे किचकट काम तुमच्या वाटय़ाला येईल. त्याचे श्रेय ऑक्टोबरपासून पुढे मिळेल. एकंदरीत वर्ष चांगले आहे.

घरामधल्या एखाद्या प्रश्नामुळे तुम्ही जर गांगरून गेला असाल, तर त्यावरती २०१७ सालच्या सुरुवातीला अनुकूल घडामोडी घडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुनी किंवा नवीन प्रॉपर्टी यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर फेब्रुवारीनंतर तोडगा निघू शकेल. कौटुंबिक वादविवाद संपल्याने जिवाला शांतता मिळेल.

तरुणांची अस्थिरता कमी होईल. त्यांनी विनाकारण नोकरी व्यवसायात बदल करू नये. महिलांना घरगुती प्रश्न आटोक्यात आल्याने दिलासा लाभेल. विद्यार्थ्यांना ग्रहांची चांगली साथ मिळणार आहे. त्यांनी नशिबावर अवलंबून राहू नये.

कन्या या वर्षांत राशीतील गुरू आणि तृतीय स्थानातील शनी या दोन ग्रहांनी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवली. नवीन वर्षांत गुरू तुम्हाला चांगली साथ देणार आहे. पण चतुर्थ स्थानाकडे येणारा शनी विशेष अनुकूल नाही. व्यावसायिक प्रगतीला वर्ष चांगले आहे. पण घरातील वातावरण बदलल्यामुळे तुम्हाला सतर्क राहावे लागेल. याचा समन्वय साधताना तुमची तारेवरची कसरत होईल.

नोकरीच्या दृष्टीने राशीतील गुरूचे भ्रमण प्रगतिकारक ठरेल. जे चांगले काम तुम्ही पूर्वी केले आहे, त्याची पावती तुम्हाला बढती आणि पगारवाढ या स्वरूपात मिळेल. या दृष्टीने एप्रिल ते जून हा कालावधी चांगला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर आणि जुलच्या सुमारास एखाद्या विचित्र प्रश्नाला तोंड द्यावे लागेल. येत्या वर्षांत अधिकाराचा गरवापर होण्याचा मोह होईल, तो टाळा. काहींना परदेशात जाण्याची संधी मिळेल.

व्यापार-उद्योगात एखादे बराच काळचे स्वप्न साकार करण्याचा तुमचा इरादा असेल. त्याची पूर्वतयारी तुम्ही या आधीच केली असेल. नवीन प्रोजेक्ट फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होतील. नोव्हेबर-डिसेंबरमध्ये पशाची तंगी जाणवेल. पण त्याची कसर एप्रिलनंतर भरून निघेल. कारखानदार मंडळी विस्ताराच्या योजना अंमलात आणतील. छोटय़ा व्यापाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पसे मिळतील.

चतुर्थ स्थानातील शनीचे भ्रमण गृहसौख्याच्या दृष्टीने विशेष चांगले नाही. ज्या जबाबदाऱ्यांची तुम्हाला पूर्वी सूचना मिळाली होती त्या प्रत्यक्षात मार्गी लावायला लागतील. लहान मोठय़ा व्यक्तींची प्रगती आणि स्वास्थ्य याकडे लक्ष द्यावे लागेल. वडिलोपार्जति इस्टेट किंवा जमीनजुमला असेल तर त्यावर वादविवाद होण्याची शक्यता आहे. पण गुरूचे भ्रमण चांगले असल्यामुळे तुमचे नतिक धर्य उत्तम राहील. प्रकृतीकडे मात्र लक्ष द्या.

तरुणांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. महिलांना कंटाळवाणे वर्ष आहे. त्यांच्या आवडीनिवडीवर मुरड घालावी लागेल. विद्यार्थ्यांना नशिबाची साथ मिळेल.

तूळ साडेसातीच्या अंतिम टप्प्यात तुम्ही सध्या आहात. फेब्रुवारी महिन्यात साडेसाती संपणार या अपेक्षेने तुम्ही आनंदी असाल, पण गुरूचे भ्रमण तुम्हाला विशेष चांगले नाही. कारण गुरू बाराव्या स्थानात भ्रमण करणार आहे. बाहेरून जेवढय़ा गोष्टी सोप्या वाटतात, तेवढय़ा त्या असणार नाही. त्या साध्यच करण्याकरिता तुम्हाला सरहद्दीवरच्या जवानाप्रमाणे सतर्क राहावे लागेल.

व्यापार-उद्योगात फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी थोडासा खडतर आहे. जे काम आपण हातामध्ये घेतले आहे ते पूर्ण करू शकू का, याची तुमच्या मनामध्ये शंका असेल. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिने आíथकदृष्टय़ा समाधानकारक जातील. फेब्रुवारी ते सप्टेंबर हा कालावधी विशेष अनुकूल आहे. या दरम्यान तुम्ही तुमचे उद्दिष्ट पूर्ण करू शकाल. जून ते ऑगस्ट या दरम्यान चांगला फायदा होईल. पूर्वीची बरीचशी कर्जे तुम्ही आटोक्यात आणू शकाल.

नोकरदार व्यक्तींना न आवडणारे काम जानेवारीपर्यंत करावे लागेल. सुरुवातीला त्यांना त्याची भीती वाटेल, पण नंतर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल. त्यामुळे आíथक आणि इतर फायदे मिळतील. बदली हवी असेल तर मार्च-एप्रिलच्या सुमारास प्रयत्न करा. ज्यांना नोकरीत बदल करायचे असतील त्यांना ऑगस्ट-सप्टेंबर महिना चांगला आहे. परदेशी जाण्याचे स्वप्न येत्या वर्षांत पूर्ण होईल.

गृहसौख्याच्या दृष्टीने वर्ष संमिश्र आहे. फेब्रुवारीपर्यंत शनी धनस्थानात राहील. तो तुमचा तणाव वाढवणारा आहे. कुटुंबातील व्यक्तींची तुम्हाला काळजी वाटेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरिता पसे उभे करावे लागतील. फेब्रुवारीनंतर तुमचा तणाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. एकेक उद्दिष्ट पार पडल्यावर तुम्ही शांत व्हाल. नवीन घराचा विचार त्या वेळेला तुम्ही करू शकता. जुनी प्रॉपटी विकली जाईल.

तरुणांना येत्या वर्षांत बऱ्याच कष्टानंतर स्थिरता लाभेल. पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण येईल. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी बरेच कष्ट पडतील.

वृश्चिक गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासून शनी आणि मंगळ हे दोन ग्रह तुमच्या राशीमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी अनेक अनपेक्षित प्रश्न निर्माण केले. त्यामुळे तुमच्यापकी बऱ्याच जणांचा आत्मविश्वास गेला. आता साडेसातीचा मध्यभाग संपणार आहे आणि शेवटचा टप्पा सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल. संपूर्ण वर्ष तुम्हाला गुरूची उत्तम साथ आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतील.

व्यापार-उद्योगात आपल्या हातून काय चूक झाली याचा परामर्श घ्या. त्यातून तुम्हाला बरेच शिकायला मिळेल. फेब्रुवारीनंतर एखाद्या प्रोजेक्टमध्ये अडकून राहिलेले पसे मिळायला सुरुवात होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुल, ऑगस्ट, सप्टेंबर यादरम्यान चांगले पसे आणि काम मिळेल. येत्या वर्षांत फार मोठी कर्जे घेऊ नका, नाहीतर मिळालेल्या पशाचा आनंद मिळणार नाही. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. मोठे प्रोजेक्ट शक्यतो टाळा.

नोकरदार व्यक्तींना एखाद्या कंटाळवाण्या पर्वातून सुटका झाल्याचा आनंद मिळेल. त्यांनी आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडले, पण त्याचे श्रेय त्यांना मिळाले नाही, अशी भावना त्यांच्या मनामध्ये असेल. फेब्रुवारीनंतर त्यांनी केलेल्या कामाची पावती मिळेल. त्यामुळे त्यांचे समाधान होणार नाही हा भाग वेगळा. येत्या वर्षांत बढतीऐवजी पगारवाढीत समाधान मानावे लागेल. बदली कामातील बदलाचे योग ऑगस्ट-सप्टेंबपर्यंत आहे.

घरामध्ये एखाद्या मोठय़ा समस्येने तुम्हाला अडचणीत टाकले असेल तर त्यातून सुटका व्हायला सुरुवात होईल. फेब्रुवारीनंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पद्धतीने जीवन जगू शकाल. जुनी प्रॉपर्टी विकणे किंवा नवीन खरेदी करणे अशा गोष्टींना जून ते सप्टेंबर या दरम्यान मुहूर्त लाभेल. नातेवाईकांशी संबंध बिनसले असतील ते आता हळूहळू पूर्ववत होतील.

तरुणांची सत्त्वपरीक्षा पाहणारे वर्ष आहे. त्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे, त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रमाणात यश मिळेल. महिलांना प्रत्येक प्रश्न सोडवायला खंबीरपणे उभे राहावे लागेल.

धनू २०१६ सालाच्या सुरुवातीपासून राश्याधिपती गुरूने तुम्हाला उत्तम साथ दिली, पण बराच काळ व्ययस्थानात असलेल्या मंगळाने तुमची गरसोय केली. तुमचा काहीही दोष नसताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. नवीन वर्षांत साडेसातीचा मध्यभाग सुरू होणार आहे. ज्या चुका तुम्ही पूर्वी केल्या होत्या त्याची तुम्हाला जाणीव होईल. आता तुमचे धोरण तुम्हाला लवचीक ठेवावे लागेल. गुरूची साथ असल्याने ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा.

व्यापार-उद्योगात अनेक गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतील. त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करायची तुमची तयारी असेल, पण अचानक येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुम्हाला तुमची वाट वाकडी करावी लागेल. नोव्हेंबर, डिसेंबर आणि एप्रिलमध्ये पसे चांगले मिळतील. जून-जुलनंतर नवीन कामाला मुहूर्त लाभेल. तुमच्या आíथक आणि इतर मर्यादा सांभाळून काम करा. विनाकारण पशाचा धोका पत्करू नका.

नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांच्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. शक्यतो नोकरीमध्ये बदल करू नका. नाईलाज झाला तर फेब्रुवारी किंवा जूनमध्ये असे बदल करा. येत्या वर्षांत प्रमोशन देण्याचे वरिष्ठ आश्वासन देतील. पण अचानक घडणाऱ्या घडामोडींमुळे त्याची तहान पगारवाढीवर भागवावी लागेल. काहीजणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल, पण त्यातून म्हणावा इतका आíथक फायदा मिळणार नाही.

गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडेसे खडतर आहे. तुम्हाला तुमच्या इच्छांवर मुरड घालावी लागेल. व्यापारातील किंवा नोकरीच्या कामाच्या निमित्ताने कदाचित घरापासून लांब रहावे लागेल. पूर्वी ठरलेला एखादा शुभ कार्यक्रम नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जूनच्या सुमारास पार पडेल. नवीन जागा घेण्यापूर्वी आíथक बाबींचा विचार करा. या वर्षांत तुमचे खरे हितचिंतक कोण आहे याची परीक्षा होईल.

तरुण मंडळींनी येत्या वर्षांत प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवावे. स्थिरतेवर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शॉर्टकट घेऊन चालणार नाही. महिलांना प्रिय व्यक्तींच्या बाबतीत नवीन आणि विचित्र अनुभव येईल.

मकर २०१६ सालामध्ये शनी आणि मंगळ या दोन ग्रहांची तुम्हाला चांगली साथ मिळाली.

त्यामुळे तुम्ही बऱ्याच गोष्टी साध्य करू शकलात. नवीन वर्षांत गुरूची तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे, पण साडेसातीची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा पवित्रा सावध ठेवणे आवश्यक आहे. अति अभिलाषा न ठेवता स्वत:च्या मर्यादेत राहा, नाहीतर नंतर पस्तावण्याची वेळ येईल.

व्यापारीवर्गाला येत्या वर्षांत त्यांच्या कामात विस्तार करावासा वाटेल. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करण्याची त्यांची तयारी असेल. नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी चांगला आहे. या दरम्यान प्रगतीचा एक नवीन उच्चांक गाठता येईल. त्यानंतर सष्टेंबपर्यंत अचानक वातावरण बदलण्याची शक्यता आहे. सरकारी नियम, तांत्रिक अडचणी आणि योग्य व्यक्तींची साथ न मिळाल्यामुळे बरीच गरसोय होईल. पशाचा काटकसरीने वापर करा.

नोकरीमध्ये वर्षांची सुरुवात उत्तम होईल. तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची पावती मिळेल. तुम्हाला बरे वाटेल. पगारवाढ किंवा बढतीची शक्यता २०१७ च्या सुरुवातीला संभवते. यामुळे तुम्ही खूश व्हाल, पण फेब्रुवारीनंतर तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. त्याचा कौटुंबिक जीवनावरसुद्धा परिणाम होईल. काहींना घरापासून लांब रहावे लागेल. मिळालेले पसे अपुरे वाटतील. येत्या वर्षांत अधिकारांचा दुरुपयोग करू नका.

गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष म्हणजे मानलं तर समाधान असे आहे. प्रयत्न करूनही ज्या गोष्टी मिळत नव्हत्या, त्या गोष्टी फेब्रुवारीपूर्वी मिळतील. नवीन जागेचे स्वप्न साकार होईल. फेब्रुवारीनंतर घरामधला एखादा सोहळा मे महिन्यापर्यंत लांबवावा लागेल. मार्चनंतर पुढील दिवाळीपर्यंत तुम्हाला एखादी नतिक घरगुती जबाबदारी पार पाडावी लागेल. ही गोष्ट मानसिक आणि आíथकदृष्टय़ा त्रासदायक असेल. नातेवाईक आणि मित्रांच्या फार जवळ जाऊ नका.

तरुणांनी कोणतीही गोष्ट गृहीत धरू नये. आपले कर्तव्य पार पाडावे. विद्यार्थ्यांना चांगले वर्ष आहे. महिलांना खट्टा-मिठा अनुभव येईल.

कुंभ २०१६ सालाच्या सुरुवातीपासून राश्याधिपती शनी तुम्हाला अनुकूल होता. त्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या, पण दशमस्थानामधल्या मंगळाने तुमची बरीच धाववळ केली. सप्टेंबरनंतर गुरू अष्टमस्थानात आला. त्याने ठरविलेले उद्दिष्ट बदलायला भाग पाडले. येत्या वर्षांत करियर उत्तम असेल, पण व्यक्तिगत जीवनात तुम्हाला तडजोड करावी लागेल.

व्यापारउद्योगात तुमचे इरादे बुलंद असतील. भरपूर काम करून भरपूर पसे मिळविण्याचा तुमचा इरादा असेल, पण स्पर्धकांचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही उद्दिष्ट ठरवू नका. अष्टमस्थानामधला असलेला गुरू तुमचे काम कमी करायला भाग पाडेल. त्याला सभोवतालची परिस्थिती जबाबदार असेल. डिसेंबर ते एप्रिल या दरम्यान एखादे मोठे प्रोजेक्ट पूर्ण होईल. जुल ते सप्टेंबर या दरम्यान पशाची गुंतवणूक जपून करा. एकंदरीत ग्रहमान संमिश्र आहे.

नोकरदार व्यक्तींना त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. नवीन वर्षांच्या सुरुवातीला एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. हे काम जानेवारीपर्यंत सुरू होईल. संस्थेतर्फे एखादी विशेष सुविधा मिळाल्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. एप्रिलनंतर जुलपर्यंत कामाचे स्वरूप सारखे बदलत राहील. येत्या वर्षांत चांगले काम केल्याबद्दल पगारवाढ होईल; पण शक्यतो बढती स्वीकारू नका, कारण तुम्ही त्याला न्याय देऊ शकणार नाही.

कौटुंबिक जीवनात मात्र तुम्हाला तुमच्या इच्छा-आकांक्षेवर मुरड घालावी लागेल. अनेक बेत ठरवाल. त्यातील यश कुटुंबातील इतर व्यक्तींचे सहकार्य कसे मिळते यावर अवलंबून असेल. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करावेसे वाटेल. घरामधल्या एखाद्या सदस्याच्या प्रश्नामुळे तुमचे विचारचक्र बदलेल. एप्रिल किंवा ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास स्थलांतर होण्याची शक्यता आहे. वर्षभर प्रकृतीकडे लक्ष द्या.

तरुणांना वर्ष चांगले आहे. मात्र फार मोठे धोके घेऊ नये. महिलांना घरामध्ये प्रत्येक गोष्टीत गृहीत धरले जाईल. त्याचा त्यांना कंटाळा येईल.

विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करून चांगली प्रगती करता येईल.

मीन राश्याधिपती गुरू आणि शनी या दोन महत्त्वाच्या ग्रहांची तुम्हाला येत्या वर्षांत उत्तम साथ मिळणार आहे. २०१६ सालाच्या सुरुवातीपासून तुम्ही जे उद्दिष्ट ठरविले होते, ते साकार व्हायला अनुकूल वातावरण मिळेल. एखादे मोठे ध्येय तुम्ही पूर्ण करू शकाल. संपूर्ण वर्ष मंगळसुद्धा तुम्हाला एक प्रकारची नवीन ऊर्जा देणार आहे. आता मागे वळून बघायची गरज नाही.

व्यापार-उद्योगात ज्या अडचणींचा सामना तुम्ही सप्टेंबपर्यंत केला होता, त्या संपत आल्यामुळे तुम्ही चांगले काम करू शकाल. मार्च-एप्रिलमध्ये चांगले पसे मिळतील. एप्रिल-मेच्या सुमारास एखादी छोटीशी परदेशवारीसुद्धा करावी लागेल. कारखानदार मंडळी विस्ताराच्या योजना हाती घेतील. त्यातील मोठा टप्पा सप्टेंबपर्यंत पार पडेल. नवीन भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. एकंदरीत वर्ष चांगले आहे.

नोकरदार व्यक्तींना बऱ्याच काळानंतर त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. मे-जून या महिन्यात बदली किंवा कामाच्या स्वरूपातील बदल होण्याची शक्यता आहे. येत्या वर्षांकरिता तुमची निवड होईल. जादा अधिकार मिळाल्यामुळे कामाचा तणाव वाढेल.

गृहसौख्याच्या दृष्टीने वर्ष सौख्यकारक ठरेल. पूर्वी ठरविलेली काय्रे काही कारणाने लांबली असतील, तर त्याला मुहूर्त लाभेल. नवीन जागेमध्ये प्रवेश करण्याचे योग जानेवारी किंवा जुलमध्ये संभवतो. कुटुंबीयांसमवेत लांबच्या प्रवासाचे योग एप्रिलच्या सुमारास आहेत. एखाद्या आवडत्या व्यक्तीची काही काळजी वाटत असेल, तर ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल. लांबच्या नातेवाईकांना भेटण्याचा योग येईल.

तरुण मंडळींना ग्रहांची उत्तम साथ आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती करता येईल आणि वैवाहिक जीवनात पदार्पण होईल. महिलांचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठी मजल मारता येईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com