पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी आज सांगली जिल्ह्यात झालेल्या मतदानामध्ये ४२ हजार ३८४ पदवीधर मतदारांनी तर ६ हजार २०६ शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पदवीधर मतदारसंघासाठी  २९.८२ टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी ६१.९६ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यात १ लाख ४२ हजार १२३ मतदार होते. त्यापकी ४२ हजार ३८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३३ हजार ७७ पुरुष मतदार आणि ९ हजार ३०७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी सांगली जिल्ह्यात १० हजार १६ मतदार होते. त्यापकी ६ हजार २०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४ हजार ७८८ पुरुष मतदार आणि १ हजार १८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.