महाराष्ट्रात ९ हजार ६१५ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये २७८ मृत्यू झाले आहेत. आज ५ हजार ७१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५७ हजार ११७ अशी झाली आहे. यापैकी १ लाख ९९ हजार ९६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन १३ हजार १३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार ७१४ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. आत्तापर्यंत १ लाख ९९ हजार ९६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज १०५७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २८५ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई, दिल्ली अहमदाबाद या शहरांमध्ये करोनाचा आलेख आता खालावू लागला आहे. तरीही करोनाचा धोका टळलेला नाही. पावसाळ्यामुळे हा धोका पुन्हा वाढू शकतो अशी शक्यता दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी व्यक्त केली आहे.