23 January 2021

News Flash

रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू

जंगलात हे जाळे कुणी लावले याचा शोध सुरू आहे

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

सावली तालुक्यातील जंगलात रानडुक्कराची शिकार करण्यासाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकून पडला. यानंतर जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने केलेल्या धडपडीमुळे तो अधिकच अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्यहाडखुर्द उपवनक्षेत्रातील शिर्शी बिट क.न.1534 मौजा साखरी माल येथे आज सकाळी उघडकीस आली.

जाळ्यात बिबट्या अडकल्याची माहिती वनविभाग सावली यांना देण्यात आली, त्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन घटना स्थळी रवाना झाले. घटनास्थळी पाहणी केली असता जाळ्यात अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे दिसले.

या अगोदर बिबट्याला जाळी बाहेर काढण्यासाठी चंद्रपुरवरून पथक बोलवण्यात आले होते. मात्र ते पोहचण्याचा अगोदरच बिबट्याचा मृत्यू झालेला होता. याच परिसरामध्ये काही दिवसांपूर्वी रानडुक्कराच्या शिकार प्रकरणी 6 आरोपीना अटक करण्यात आलेली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा रानडुक्कराची शिकार करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.  तर, जंगलात हे जाळे कुणी लावले त्याचा तपास वनाधिकारी करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 1:32 pm

Web Title: a leopard dies after being caught in a net msr 87
Next Stories
1 ‘ताज’ला भाडेपट्ट्याने जमीन, सिंधुदुर्गात पहिले पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा
2 जिगरबाज महाराष्ट्र पोलीस! ४८ तासांत एकाही पोलिसाला करोनाची लागण नाही
3 चंद्रपूरात पाच वर्षीय मुलासह आढळले तीन नवे करोनाबाधित रुग्ण
Just Now!
X