तरुणीने केलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजनंतर ठाणे पोलीस आयुक्तांनी तात्काळ दखल घेत स्थानिक पोलिसांना कारवाईचा आदेश दिला. स्थानिक पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने तरुणाने थेट पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करत आपली तक्रार नोंदवली. तरुणीचा मेसेज मिळताच विवेक फणसाळकर यांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तरुणीच्या तक्रारीची दखल घेण्याचा आदेश दिला.

थेट पोलीस आयुक्तांकडूनच आदेश आला असल्याने पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. पोलीस ठाण्यात बलात्काराची केस दाखल झाली असून 29 वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीचा रहिवासी असलेला सचिन पाटील हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्री झाली होती. सचिन पाटील याने तरुणीला लग्नाचं आश्वासन देत तिच्यासोबत शरिरसंबंध ठेवलं होते.

‘इतकंच नाही तर आरोपी तरुणीला भिवंडी येथील एका मंदिरात घेऊन गेला होता. तिथे दोघांनी लग्न केलं. पण काही दिवसांनी हे लग्न अवैध असल्याचं तो सांगू लागला’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. ‘त्याने तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तिचं सोशल मीडिया अकाऊंटही त्याने आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यावरुन तिच्या मित्रांना, नातेवाईकांना तो अश्लील मेसेज पाठवत होता’, असंही सांगण्यात आलं आहे.

यानंतर पीडित तरुणीने डोंबिवलीमधील विष्णू नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. अखेर न्याय मिळवण्यासाठी तरुणीने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज करत मदत मागितली.