News Flash

हातात पिस्तूल घेऊन व्हिडीओ शूट करणारा पोलीस निलंबित; Video Viral झाल्यानंतर कारवाई

हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याने या व्हिडीओची दखल घेतली आहे

Police Viral Video
ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्याचं निलंबन

सोशल नेटवर्किंगवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे व्हिडीओ शूट करुन पोस्ट करत असतात. मात्र अमरावतीमधील एका पोलीस कर्मचाऱ्याला अशाप्रकारे व्हिडीओ शूट करुन सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करणं फारच महागात पडलं आहे. या व्हिडीओ प्रकरण पोलीस खात्याने कठोर कारवाई करत या कर्मचाऱ्याचं निलंबन केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस गणवेशामध्ये हातात पिस्तूल घेऊन या कर्मचाऱ्याने एका व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत हा पोलीस कर्मचारी एक डायलॉग मारतो आणि नंतर पिस्तूल दाखवताना दिसत आहे. आपली डायलॉगबाजी झाल्यानंतर हा कर्मचारी मोटरसायकलवरुन उठून पुढे चालू लागतो आणि व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर पोलीस खात्याने या व्हिडीओची दखल घेतली आहे. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही पोलीस खात्यात कामाला असल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस खात्याने यासंदर्भात कठोर कारवाई केली आहे. ड्युटीवर असतानाच शासकीय गणवेश आणि शस्त्राचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत या कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे या डयलॉगबाजीने पोलीस कर्मचाऱ्याच्या नोकरीवर गदा आणल्याचं चित्र दिसत आहे. हा व्हिडीओ अमरावतीमधील चांदूरबाजार येथील पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये सध्या तरी या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे समजते.

पुण्यातून काल तिघांना अटक

अशाप्रकारे पिस्तूल आणि शस्त्रांसोबत फोटो पोस्ट केल्याने एखाद्यावर कारवाई करण्याची मागील दोन दिवसांमधील महाराष्ट्रातील ही दुसरी घटना आहे. बुधवारीच पुणे पोलिसांनी अशाच एका कारवाईमध्ये तीन जणांना अटक केलीय. पिस्तूलासोबत फोटो काढून तो व्हॉटसअ‍ॅप स्टेट्सला ठेवल्याने गुंडगिरीविरोधी पथकाने कारवाई करत एकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर, इन्स्टग्रामवर तोंडात कोयता घेऊन त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याला आणखी दोघांवर कारवाई करत एकूण तीन जणांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. या लोकांकडून पोलिसांनी एक पिस्तुल, एक जिवंत कडतुस, लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.

सूरज सिंगसाहब जैस्वाल (२०), राज शर्मा (१८), मयूर अनिल सरोदे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज जैस्वालने पिस्तूलासोबतचा फोटो व्हॉटसऍप स्टेट्सला ठेवला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार आरोपी सूरजला सापळा रचून बेड्या ठोकल्यात आल्या. तर, तोंडात कोयता घेऊन त्याचा फोटो व्हायरल करणाऱ्याला राज शर्माला पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच, इन्स्टग्रामवर कोयत्यासह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मयूरला देखील या पथकाने शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी राजूवर खुनाचा प्रयत्नसह आणखी गुन्हा दाखल आहे. संबंधित आरोपींवर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2021 2:26 pm

Web Title: amravati police officer suspended after his video in police dress with gun goes viral scsg 91
Next Stories
1 “पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष मदत १५०० कोटी रुपयांचीच”; राज्य सरकारच्या पॅकेजवर फडणवीसांची टीका!
2 राहुल गांधींनी खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो व्हायरल; संजय राऊत म्हणाले…
3 ऑलिम्पिक गाजवणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबाला धमकी; साताऱ्यातील गाव सोडण्याचा निर्णय
Just Now!
X