News Flash

पोलीस अधीक्षकांच्या घराच्या आवारातच दरोड्याचा प्रयत्न

सांगलीतील धक्कादायक प्रकार, दरोडेखोरांचा पोलिसांवर हल्ला

पोलीस अधीक्षकांच्या घराच्या आवारात दरोड्याचा प्रयत्न

सांगलीतील पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानाच्या आवारातच दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तर दोन आरोपी फरार आहेत.

पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थान परिसरातील चंदनाची झाडे तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून सुरू होता. यावेळी पोलीस दरोडेखोरांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही.

बुधवार पहाटे पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्यांवर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. या दरोडेखोरांकडून पोलिसांनी सत्तूर आणि करवत जप्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 6:36 pm

Web Title: attempt of robbery at sangali police superintendents residence
Next Stories
1 आर्थिक विवंचनेला कंटाळून तलावात उडी मारून नागपूरच्या दाम्पत्याची आत्महत्या
2 रस्त्यांच्या प्रश्नांबाबत शिवसेना आक्रमक
3 टॅब वितरणासाठी निधी आला कुठून – नवाब मलिक
Just Now!
X