“मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत विद्यमान सरकार जबाबदार आहे. आम्ही मेहनतीनं मराठा आरक्षण आम्ही उच्च न्यायालयात टिकवलं. जे मुद्दे आम्ही उच्च न्यायालयात उपस्थित केले आणि ते त्यांनी मान्य केले आणि तेच सर्वोच्च न्यायालयात व्हायला हवं होतं. न्यायालयानं त्यांच्या निकालपत्रात कसं सरकार अपूरं पडलं हे सांगितलं. त्यात मराठा समाज कसा मागास आहे हे सिद्ध करता आलं नाही, ५० टक्क्यांच्या वर आरक्षण का हवं हे सिद्ध करता आलं नाही, असं न्यायालयानं निकालपत्रात म्हटल्याचं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. चांगल्या समन्वयानं हा खटला जिंकता आला असता. काँग्रेसच्या काही नेत्यांना आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षणात कमीपणा वाटत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आणखी वाचा- “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन कुणीही राजकारण करु नये”

“मराठा समजाला आरक्षण मिळालं तर मागास समाज होईल अशी काँग्रेसमधल्या काही बड्या नेत्यांची कायमच मानसिकता राहिली आहे. मागास नसलेला समाजाचं स्टेटस आपलं जाईल असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी यामध्ये काहीही केलेलं दिसत नाही,” असं पाटील म्हणाले. “विरोधकांनी यापूर्वी काय केलं हा त्यांच्या संस्कृतीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे समाजात दुही निर्माण करणं, भांडणं करणं, जाळपोळ करणं ही आमची संस्कृती नाही. परंतु आम्हीही आंदोलन करणार आहोत. ज्या मुलांना शैक्षणिक प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांना नोकरी मिळता मिळता राहिली त्यांच्यात आपणहूनच अस्वस्थता निर्णाण होईल. सरकारनं मराठा समाजाला योग्य ती मदत करावी,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- मराठा आरक्षण प्रकरणी विरोधकांना राजकारण करायचं आहे, पण आम्हाला… – शरद पवार

विरोधकांना राजकारण करायचंय – शरद पवार</strong>

“मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावी असं वाटत असेल,” अशी टीका शरद पवार यांनी केली. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन करताना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.