बॉलिवूड अभिनेता आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार कुशल पंजाबीने गुरुवारी आत्महत्या केली. मुंबईमधील राहत्या घरात संध्याकाळच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाची माहिती समजल्यानंतर चाहत्यांमध्ये आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. परंतु त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यातच कुशलने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत.

आत्महत्या करण्यापूर्वी कुशलच्या मनात नेमके काय विचार सुरु होते हे सांगणं कठीण आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी कुशले त्याच्या लहान मुलासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोवरुन त्याचं त्याच्या मुलावर किती प्रेम होतं हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे या बाप-लेकाचा फोटो पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Punjabi. (@itsme_kushalpunjabi) on


हा फोटो शेअर करत त्याने कोणताही मेसेज लिहिला नाही. मात्र तीन रंगाच्या हृदयाची चिन्हांचं कॅप्शन दिलं.

काय आहे कुशल पंजाबीच्या आत्महत्येचं प्रकरण?

कुशल पंजाबी हा लोकप्रिय कलाकार असून त्याने वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली. या आत्महत्येपूर्वी त्याने एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र पाहता त्याने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून कुशल पंजाबी याला काम मिळत नसल्यामुळे तो नैराश्यात गेला होता असं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून घेतली आहे.

कोण आहे कुशल पंजाबी?
कुशलने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ‘लव मॅरेज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ‘इश्क में मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तसंच कुशलने चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकार म्हणूनही काम केले आहे. त्याने अक्षय कुमारसोबत ‘अंदाज’, अजय देवगणसोबत ‘काल’ आणि सलमान सोबत ‘सलाम-ए-इश्क’ आणि ‘दन दना दन गोल’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.