News Flash

चंद्रपूर – ३० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून तरूण अभियंत्याला जिवंत जाळलं

आरोपीला अटक; अपहरणानंतर २८ दिवसांनी केली हत्या

संग्रहीत

चंद्रपुरमधील घुग्घुस येथील वेकोली रामनगर वसाहतीत राहणारा तरुण अभियंता शुभम फुटाणे (२५) याची अपहरण करून, २८ दिवसानंतर ३० लाखांच्या खंडणीसाठी जिवंत जाळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) समोर आली आहे. याप्रकरणी घुग्घुस पोलिसांनी आरोपी गणेश पिंपळशेंडे याला अटक केली आहे.

शुभम फुटाणे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जातोय, असे सांगून घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने शुभमच्या आईला फोन करून, शुभमचे अपहरण केले असल्याची माहिती दिली होती. तसेच ३० लाखांची खंडणी देखील मागितली होती.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी घुग्घुस येथील डॉ.दास यांच्या रूग्णालयाजवळ शुभमची मोटरसायकल आढळली होती. तेव्हापासून स्थानिक गुन्हेशाखेचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, घुग्घुस पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र आज त्याच्या हत्येची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांचा संशय एका व्यक्तीवर होता. त्याच्यावर पाळत ठेवली गेली. वाहनावरील रक्ताचे आणि आरोपीच्या रक्ताचे नमूने तपासले असता त्यात साम्य आढळले. आरोपीची चौकशी केली असता व घराची झाडाझडती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ठाणेदार राहुल गांगूर्डे यांनी घुग्घुस लगतच्या स्वागत लॉन येथे आरोपी पिंपळशेंडे याला नेले असता शुभम फुटाणे याचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला. अधिक तपासासाठी पोलिसांनी शुभमच्या डोक्याची कवटी हस्तगत केली आहे. तर, जाळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी आणखी बरीच माहिती समोर येईल, असे घुग्घुस पोलिसांनी सांगितले आहे. मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळाला असून आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवंत नांदेडकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2021 9:34 pm

Web Title: chandrapur a young engineer was abducted and burnt alive for a ransom of rs 30 lakh msr 87
Next Stories
1 Coronavirus – राज्यात मागील २४ तासांत ३ हजार ६११ करोनाबाधितांची वाढ, ३८ रुग्णांचा मृत्यू
2 मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार – सुभाष देसाई
3 पूजा चव्हाण प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन माध्यमांना दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X