03 December 2020

News Flash

Coronavirus: राज्यात दिवसभरात २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर

राज्यात आतापर्यंत ५५ लाखांहून अधिक चाचण्या

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात आज दिवसभरात २३ हजार ३६५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासोबत राज्यातील करोनाबाधित रुग्णसंख्या ११ लाख २१ हजार २२१ इतकी झाली आहे. दुसरीकडे ४७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या ३० हजार ८८३ इतकी झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात सध्या १७ लाख ५३ हजार ३४७ लोक होम क्वारंटाइन असून ३६ हजार ४६२ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 8:33 pm

Web Title: coronavirus 23 thousand 365 new cases and 474 deaths reported in maharashtra sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 २४ हजारांवरुन थेट ४० हजार, आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ; अजित पवारांचा निर्णय
2 “हा असंवेदनशीलतेचा कळस आहे,” फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून व्यक्त केला संताप
3 भ्रष्टाचार केला तेच चौकशी करत असल्याचे दिसत आहे – चंद्रकांत पाटील
Just Now!
X