मुंबई  :  करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात आतापर्यंत ५० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक ११ हजार रुग्ण मुंबईमध्ये दगावले. राज्यात गेल्या चोवीस तासांत ३,५८१ नव्या रुग्णांचे निदान झाले. ५७ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबई ५९६, पुणे शहर २९८,नागपूर शहर ३६५, नाशिक शहर १७४ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत महाराष्ट्रात १९ लाख ६५ हजार करोनाबाधित झाले असून, त्यापैकी १८ लाख ६१ हजार रुग्ण बरे झाले आहेत.  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९४.७ टक्के  आहे. आतापर्यंत ५०,०२७ रुग्णांचा मृत्यू झाला.   मुंबईत ११,१८१, ठाणे शहरात १२४१, नवी मुंबईमध्ये १०९६, कल्याण-डोंबिवलीत ९९१, नाशिकमध्ये १०२५, नगरमध्ये ६७३, जळगाव येथे ११५१, पुणे शहरात ४४३५, पिंपरी-चिंचवडमध्ये १२८८, उर्वरित पुणे जिल्ह्य़ात २०९८, सातारा जिल्ह्य़ात १७८५, कोल्हापूर जिल्ह्य़ात १६६३, औरंगाबादमध्ये  १२२३, नागपूर शहरात २५५९  रुग्ण करोनामुळे दगावले.