News Flash

…असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा!; फडणवीसांकडून ठाकरे सरकारचं कौतूक

"करोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली"

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

सचिन वाझे… परमबीर सिंह ते पोलीस बदल्यांचा घोटाळा आदी प्रकरणात आरोप करत ठाकरे सरकारला कोडींत पकडू पाहणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या कामाचं कौतूक केलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणापासून फडणवीस यांचं आक्रमक रुप बघायला मिळत होतं. आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. राज्यात करोना रुग्णांचा विस्फोट झाल्याची स्थिती असून, दररोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं सरकारने चाचण्याचं प्रमाणही वाढवलं आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबद्दल फडणवीसांनी समाधान व्यक्त केलं आहे.

“गेल्या १० दिवसांत सरासरी १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! अधिकाधिक ९० हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच करोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी करोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली होती. हळूहळू हा आकडा वाढत गेला. मार्चच्या सुरूवातीपर्यंत दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली, तर महिना अखेरीस ही संख्या ३६ हजारांवर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन करोना बाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ रुग्ण उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 3:20 pm

Web Title: devendra fadnavis praised thackeray govt for increased testing bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “… ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं!”; भाजपाने साधला निशाणा
2 …मग फडणवीसांनी ६.३ जीबीचा कोणता पेनड्राइव्ह दाखवला?; काँग्रेसचा सवाल
3 …अन् भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
Just Now!
X