20 October 2020

News Flash

धानोरकरांनी पवारांचे आभार मानल्याने काँग्रेस अस्वस्थ

वडेट्टीवारांच्या वक्तव्याला अप्रत्यक्ष छेद

शरद पवार यांच्यासोबत खासदार धानोरकर, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, राजेंद्र वैद्य.

काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात कारणीभूत ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुंबईत भेट घेऊन आभार मानले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी धानोरकरांना उमेदवारी पवार यांच्यामुळे नव्हे तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे पवार-धानोरकर भेटीकडे राजकीय चष्म्यातूनही बघितले जात आहे. यामुळे काँग्रेसमध्येअस्वस्थता आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघातून विशाल मुत्तेमवार, विनायक बांगडे यांच्याऐवजी धानोरकरांना उमेदवारी कशी मिळाली हे सर्वश्रूत आहे. या घडामोडीत शरद पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती व धानोरकर यांनीही पवार यांच्यामुळेच उमेदवारी मिळाली असे जाहीरपणे सांगितले होते. यात विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचाही खारीचा वाटा होता. धानोरकरांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी वडेट्टीवार व सुभाष धोटे दिल्लीत पंधरा दिवस ठाण मांडून होते. मात्र, प्रयत्न कामी येत नाही  हे लक्षात येताच दोघेही माघारी आले होते. शेवटी शरद पवार यांच्या शब्दाने काम केले. वडेट्टीवार यांनी ६ जून रोजी धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमात उमेदवारी शरद पवार यांच्यामुळे नाही तर अशोक चव्हाण यांच्यामुळे मिळाल्याचे सांगितले होते. त्यानंतर धानोरकर यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेऊन आभार मानले. विशेष म्हणजे, प्रदेश काँग्रेसच्या मुंबईतील बैठकीतही धानोरकर यांनी पवार यांचे आभार मानले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 2:01 am

Web Title: dhanorkar giving thanks to pawar
Next Stories
1 शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही – आदित्य ठाकरे
2 कोकणातील महामार्गाच्या हिरवळीला ग्रहण
3 … तर आज आघाडी सरकारला रस्त्यावर फिरण्याची वेळ आली नसती : उद्धव ठाकरे
Just Now!
X