शैक्षणिक सुविधा नसल्याने मुस्लिम तरूण दहशतवादाकडे आकृष्ट होत आहे. या सुविधा देण्यात केंद्र आणि राज्यातील सरकार कमी पडत असल्याची खंत शरद पवार यांनी मंगळवारी येथे व्यक्त केली. मिरजेतील मुस्लिम समाजाच्या आझाद शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, जागतिक शांततेला धोका उत्पन्न करणाऱ्या ‘आयसिस’सारख्या संघटनांचे समर्थन कधीच करता येणार नाही. या दहशतवादाने सगळय़ा जगालाच धोका निर्माण केला आहे. मात्र तरूणवर्ग या विचाराकडे का ओढला जात आहे, याचा विचार केला पाहिजे. आजचे विद्यार्थी ही देशाची संपत्ती असून देशविकासात त्यांचे योगदान घेण्यासाठी त्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. असे असताना सध्याचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार त्या विचारांचे आहे असे वाटत नाही. शिक्षणाच्या या सुविधा जागोजागी उपलब्ध न करून दिल्यानेच मुस्लीम तरूण दहशतवादाकडे आकृष्ट होत असल्याचे मत पवारांनी व्यक्त केले.

जागतिक शांततेला धोका उत्पन्न करणाऱ्या ‘आयसिस’सारख्या संघटनांचे समर्थन कधीच करता येणार नाही. या दहशतवादाने सगळय़ा जगालाच धोका निर्माण केला आहे. मात्र तरूणवर्ग या विचाराकडे का ओढला जात आहे, याचा विचार केला पाहिजे.

 – शरद पवार</strong>