28 September 2020

News Flash

माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

सन २०१४ व २०१९ मध्येही त्यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

संग्रहित छायाचित्र

माजी मंत्री, शिवसेना उपनेते अनिल रामकिसन राठोड यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

आक्रमक हिंदुत्ववादी नेता म्हणून राठोड यांची ओळख होती. १९९० ते २०१४ अशी २५ वर्षे ते नगर शहराचे शिवसेनेचे आमदार होते.  १९९५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मात्र हे मंत्रिपद त्यांच्यासाठी अल्पजीवी ठरले. सन २०१४ व २०१९ मध्येही त्यांनी शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:22 am

Web Title: former minister anil rathod passes away abn 97
Next Stories
1 सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात नद्यांना पूर
2 विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी कोसळली
3 महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस
Just Now!
X