News Flash

औरंगाबादमध्ये क्रूझरची ट्रेलरला धडक, भीषण अपघात चार भाविकांचा जागीच मृत्यू

गाढेजळगाव शिवारात हा अपघात झाला

औरंगाबादमध्ये क्रूझरचा भीषण अपघात झाला आहे. क्रूझरने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाढेजळगाव शिवारात हा अपघात झाला. मृत प्रवासी इगतपुरी येथे देवदर्शन करुन बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे परतत असताना हा अपघात झाला. काशिनाश म्हेत्रे, रवी जाधव, संगीता बुंदे आणि ऋषीधर तिडके अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण सिंदखेडराजाचे ग्रामस्थ आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण इगतपुरी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना करमाड य़ेते रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या क्रूझरने रस्त्याच्य्या कडेला उभ्या असलेल्या ट्रेलरला धडक दिली. या अपघाता चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 9:25 am

Web Title: four died in accident in aurangabad sgy 87
Next Stories
1 प्लास्टिक वापरल्याने उपायुक्तांना पाच हजार रुपयांचा दंड
2 सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण मराठवाडय़ाचा सिंचन प्रश्न हाती घेणार
3 राज्यात आठ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती
Just Now!
X