लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी घोषित करण्यात आला. यामध्ये अकोल्यातील विद्याार्थ्यांनी बाजी मारली. ‘प्रभात’चा निकाल १०० टक्के लागला असून, समीक्षा मोडकने सर्वाधिक ९५.२ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्कूल ऑफ स्कॉलरच्या स्वराली कुळकर्णीने ९१.२० टक्के गुण प्राप्त केले.

सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रभात किड्सच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे आचल काळपांडे, गायत्री राणे, मुस्कान गुप्ता, ओम आगरकर, ओम बढे, प्रतिक करंगळे, पूर्वी निंबाळकर, रोहन सरदार, संकेत गवई, श्रेयस वानखडे, तमजीद खान, वैष्णवी नळकांडे आणि यश वानखडे यांनी ‘ए-वन’ ग्रेड प्राप्त केला आहे. पूर्वी निंबाळकर ९३.६० टक्के गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर आचल काळपांडे ९२.६० टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. तसेच २१ विद्याार्थी ‘ए-२’ ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे व वंदना नारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

आचल काळपांडे या विद्याार्थिनीने ‘फिजीकल’ या विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन मंडळातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. प्रभात किड्स स्कूलची सीबीएसई उच्च माध्यमिक इयत्ता बारावीची ही दुसरी बॅच असून, प्रभातच्या एकूण ४२ विद्याार्थ्यांनी परीक्षा दिली होती.