04 July 2020

News Flash

आयपीएल सामन्यांवर सट्टा

मोरगाव येथे आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती.

तीन संशयित जेरबंद
रावेर तालुक्यातील मोरगाव येथे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळताना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत ११ लाखांचा ऐवज जप्त करत तिघांना अटक केली आहे.
मोरगाव येथे आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री अकराच्या सुमारास धाड टाकली असता त्या ठिकाणी शैलेश ठाकूर, सतीश पांडुरंग महाजन (दोन्ही रा. बऱ्हाणपूर) व प्रवीण मोरे (रा. तळेगाव) हे तिघे भ्रमणध्वनीद्वारे आयपीएलच्या सामन्यावर सट्टा घेताना रंगेहाथ आढळून आले. या ठिकाणावरून पोलीस पथकाने एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यात मारुती सुझुकी मोटार, १४ भ्रमणध्वनी, टीव्ही आणि काही रोकड यांचा समावेश आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2016 1:06 am

Web Title: ipl matches betting
टॅग Ipl
Next Stories
1 भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू
2 कोयना धरणाजवळ ४ दिवसांत ६ भूकंप
3 कशेडी घाटातील अपघातात एक महिला जागीच ठार, ३ जखमी
Just Now!
X