News Flash

भयंकर! केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा मुलगा २०० फूट खोल दरीत कोसळला

खड्ड्यात कोसळून गंभीर जखमी... पुण्यातील रुग्णालयात करण्यात आलं दाखल

भयंकर! केंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षाचा मुलगा २०० फूट खोल दरीत कोसळला

वाई तालुक्यातील केंजळगडावर आज थरकाप उडवणारी घटना घडली. केंजळगडावर ट्रेकिंग करत असताना दहा वर्षाचा मुलगा खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. त्यास पाखेरी वस्तीतील युवक आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारा केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले.

केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड (ता.पुरंदर) परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते. यामध्ये मयांक उरणे हा आपल्या वडिलांसोबत आला होता. केजळगडावर आज सकाळी सात वाजता पर्वतारोहणाला सुरुवात केली. सकाळी साडे आठ ते नऊच्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयंक उरणे (वय १०) हा दोनशे फूट खोल कोसळून गंभीर जखमी झाला.

थंड हवा, पावसाची रिप रिप आणि वाढलेलं गवत यामुळे किल्ल्याच्या पाऊल वाटेवर चिपचिप झाली आहे. यामुळे मयांकचा पाय घसरून तोल गेला आणि तो दोनशे फूट खोल दरीत कोसळून झाडाला धडकून झुडपात अडकला होता. त्याचा शोध करुनही तो सापडत नसल्याने आसरे ते रायरेश्वर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्तीवर संबंधित पर्यटकांनी येऊन माहिती दिली.

तेथील गंगाराम सपकाळ, सागर पाकीरे, सुरेश पाकीरे, रामदास पाकीरे, सचिन पाकीरे, नवनाथ पाकीरे, विलास पाकीरे, विजय पाकीरे असे सर्वजण ग्रामस्थांना सोबत घेऊन मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले असता त्यांनी खोल दरीतून त्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधुन बाहेर काढला.

वाई येथील रुग्णालयात प्राथमिक ऊपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे दाखल केलं आहे. ही माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर पोलीस नाईक व आपले सहकारी शिवाजी वायदंडे सुभाष धुळे प्रशांत शिंदे अमित गोळे गोळे संजय देशमुख संतोष शेलार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाकीरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदत कार्य केल्याबद्दल वाई तालुक्यातील नागरीकांनी वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 6:50 pm

Web Title: kenjalgad fort pune pune news accident news pune bmh 90
Next Stories
1 शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथे केले भातरोपण
2 ..तर पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल, आम्ही स्वतंत्रच लढणार – नाना पटोले
3 “ सहा महिन्यांत कोपर्डी खटल्याचा निकाल लागला पाहिजे”; संभाजीराजेंचा इशारा!
Just Now!
X