04 March 2021

News Flash

DGP दत्ता पडसलगीकरांना आज मिळणार मुदतवाढीचे पत्र: मुख्यमंत्री कार्यालय

मुख्यमंत्री फडणवीस यांची अजून सही बाकी असून उद्या दुपारी मुदतवाढीचे पत्र पडसलगीकर यांना दिलं जाईल असे गृहविभागातील अधिकाऱ्याने सांगितले

महाराष्ट्राचे मावळते पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर

– राजू परुळेकर

राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या निवृत्तीच्या व मुदतवाढीच्या प्रश्नावरून चांगलंच नाट्य रंगलं आहे. पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज निवृत्त होत आहेत. सध्या सुरू असलेली अतिमहत्त्वाची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावीत म्हणून राज्य सरकारनं त्यांना तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, निवृत्त होण्यास एक दिवस शिल्लक असतानाही त्यांच्या हातात मुदतवाढीचे पत्र मिळालेले नाही. पडसलगीकर यांच्या मुदतवाढीचे केंद्राचे पत्र आले असून आता राज्य सरकारची पुढील प्रक्रिया सुरू आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांची अजून सही बाकी असून आज दुपारी मुदतवाढीचे पत्र पडसलगीकर यांना दिलं जाईल असे गृहविभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना पडसलगीकर यांनी आपल्याला अद्याप मुदतवाढीचे पत्र मिळाले नसल्याचे सांगतानाच, जर ते वेळेत मिळाले तर स्वीकारू असे स्पष्ट केले आहे.

सध्या सुरु असलेली पुणे पोलिसांची कथित नक्षलींवरील कारवाई तसेच हिंदुत्ववादी कट्टरपंथीयांना नरेंद्र  दाभोलकर, गोविंद पानसरे व गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी झालेली अटक, आदी प्रकरणांचा तपास मार्गी लागावा म्हणून राज्य सरकारने पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. मात्र, पडसलगीकर ही मुदत वाढ नाकारून शुक्रवारी निवृत्त होणार असल्याचे वृत्त होते. त्यांच्या सेवानिवृत्तीसाठी शासकीय सलामीची जोरदार तयारी नायगाव पोलीस क्वार्टर्समध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली. पडसलगीकर यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावाची चर्चाही सुरु झाली.

दत्ता पडसळगीकरांच्या मुदतवाढीचे पत्र

महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत दत्ता पडसलगीकर हे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र सध्या राज्यामध्ये तसेच देशपातळीवर महाराष्ट्र पोलिसांनी केलेली कथित नक्षलींविरोधातील कारवाई, सर्वोच्च न्यायालयानं अटक केलेल्यांना स्थानबद्धतेत ठेवण्याचे दिलेले आदेश व कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या अटकेसंदर्भात होत असलेल्या वादग्रस्त घडामोडी पाहता तपासकामासाठी पडसलगीकर यांनाच तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं अटकसत्र, सनातन संस्थेचा होत असलेला उल्लेख, हत्यांशी सनातनचा काहीही संबंध नसल्याचा संस्थेचा दावा आदी पार्श्वभूमीवर सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना, वादाच्या भोवऱ्यात सापडण्यापेक्षा सेवानिवृत्ती घेणे उचित ठरवत पडसलगीकर सेवानिवृत्ती स्वीकारणार नाहीत, असा अंदाज काही जाणकारांनी व्यक्त केला होता. मात्र या सगळ्या अनिश्चिततेमागे पडसलगीकर यांना मुदतवाढीचे पत्रच अद्याप मिळाले नसल्याचे समोर आले आहे.

मुदतवाढीच्या त्या पत्राच्या घोळामुळे त्यांच्या निरोप संभारंभाच्या सलामीची रंगीत तालिमही गुरूवारी झाल्याचे समजते. शुक्रवारी पडसलगीकर हे पोलीस महासंचालक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. मात्र त्यांना उद्या मुदतवाढीचे पत्र मिळेल आणि हे पत्र ते स्वीकारतील असे अधिकृत संकेत मिळालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 6:31 pm

Web Title: maharashtra dgp datta padsalgikar to retire tomorrow
Next Stories
1 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कारणासाठी करणार उद्धव ठाकरेंचा गौरव
2 आरक्षणासाठी काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांचे बेमुदत उपोषण
3 आईकडून एनओसी आणाल तरच डीजेसाठी परवानगी: जिल्हाधिकारी
Just Now!
X