काँग्रेसची परंपरा भाजप सरकारातही
जिल्ह्यातील अनेक सूतगिरण्या बंद पडलेल्या असताना मोर्शीचे भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या आईंच्या नावे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या मोर्शी येथील मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य मंजूर करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी या सर्वसाधारण प्रवर्गातील सूतगिरणीची बाराव्या पंचवार्षिक योजनेत अर्थसहाय्यासाठी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. सहकारी संस्थांच्या उभारणीच्या वेळी काँग्रेसने जोपासलेली हितसंबंधांची परंपरा भाजप सरकारनेही सुरू ठेवल्याची जोरदार चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगली आहे.
डॉ. बोंडे यांनी मात्र यातून स्थानिक पातळीवर सत्तेला संस्थात्मक आधार निर्माण करण्याची किमया साधली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर सहकारी सूतगिरणी, अमरावती ग्रोअर्स स्पिनिंग मिलसह अनेक सूतगिरण्या बंद पडल्या, तर काही अवसायनात गेल्या आहेत. गेल्या वर्षी चांदूर रेल्वेच्या जवाहर सहकारी सूतगिरणीला आठव्या पंचवार्षिक योजनेतून ५ कोटी ८१ लाख रुपयांचे भागभांडवल सरकारने मंजूर केले. मात्र, इतर सूतगिरण्यांच्या नशिबी अजूनही ‘भंगार’ आहे. अनेक बंद सूतगिरण्यांविषयी निर्णय घेतले जात नसताना नवीन सूतगिरणीला झटपट अर्थसहाय्य कसे दिले जाते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील इतर सहकारी सूतगिरण्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या योजनेअंतर्गत पुनर्वसन व विस्तारीकरणाचा लाभ मिळालेला नाही. अमरावती जिल्ह्यात सध्या केवळ धामणगाव रेल्वे येथील संत गजानन सहकारी ही एकमेव सूतगिरणी सुरू आहे.

बोंडे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे आभार
मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सहकारी सूतगिरणीला अर्थसहाय्य मंजूर करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला नाही. उलट, मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी मोर्शीच्या पर्यटन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी महिलांसाठी सूतगिरणी उभारण्याविषयी दिलेला शब्द पाळला, असे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. या सूतगिरणीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे असे स्पष्ट केले.

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Mumbai, Redevelopment dispute,
मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश