News Flash

पालघरमध्ये तीन वाहनात विचित्र अपघात; एकाचा मृत्यू

दोन जण गंभीर जखमी

पालघर बोईसर रस्त्यावर उमरोळी पेट्रोल पंपनजीक तीन वाहनात विचित्र अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये उमरोळी येथील ईको चालक सुनील मोरेश्वर गावड (३२) याचा मृत्यू झाला आहे. तर या दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

उमरोळी पेट्रोल पंप परिसरात इको प्रवासी वाहन, खाजगी चारचाकी व दुचाकीचा एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात इको कार चालकाचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला झाडीत फेकले गेले होते. अपघात घडल्यानंतर मोठी गर्दी जमली.

मात्र कोणीही या जखमींना उचलण्यास तयार नव्हता. तिथे उपस्थित असलेल्या मितेश प्रभाकर पाटील,अमोल पाटील व आशिष कुडू या तीन मित्रांनी प्रसंगावधान राखत जखमींना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र यात इको चालकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.तर अपघातात इतर दोघांना गंभीर इजा झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 11:30 pm

Web Title: major accident happened on panlghar boisar road nck 90
Next Stories
1 भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बहीण आणि भावोजींचा अपघातात मृत्यू
2 महाराष्ट्रात आज आठ हजार ८०७ नव्या करोनाबाधितांची नोंद, ८० रुग्णांचा मृत्यू
3 लंडनला २१ डझन हापूस निर्यात…मुहूर्ताच्या पहिल्या पेटीला ५१ पौंडचा विक्रमी दर
Just Now!
X