आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली, मासेमारीला फटका; नागली आणि सुपारीही अतिवृष्टीने धोक्यात

अतिवृष्टी आणि वादळाचा दुहेरी फटका कोकणातील भातशेतीला बसला. रायगड जिल्ह्य़ात ३८ हजार हेक्टर, रत्नागिरी जिल्ह्य़ात ११ हजार ७०६ हेक्टर तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ३२ हजार हेक्टर क्षेत्रावरील भात पीक नष्ट झाले. नागली आणि सुपारीच्या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आंब्याला मोहर येण्याची प्रक्रिया लांबली तर शेतातील उभे पीक अतिवृष्टीने नष्ट झाल्याने शेतकऱ्याच्या शेतात आणि डोळ्यातही पाणी आणले. मासेमारीलाही वादळी पावसाचा तडाखा बसला आहे

Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?

ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यातील ‘कयार’ वादळाचा दुहेरी फटका रायगड जिल्ह्य़ात भातशेतीला बसला, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्य़ात ३८ हजार ३०० हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली. कापणीला आलेले भातपीक निसर्गाच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाले. नागली आणि सुपारीच्या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला. कृषी विभागाने पंचनाम्याची कामे पूर्ण केली असली तरी शेतकऱ्यांच्या झोळीत काय पडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. रायगड जिल्ह्य़ात १ लाख १५ हजार ९६५ हेक्टर येवढे खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा ९५ हजार ६६६ हेक्टरवर यंदा भातपिकाची लागवड करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा यातील २२ हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसला होता. १ हजार ७०१ गावातील भातपीक अतिवृष्टीने बाधित झाले. यात कापणीपश्चात ८ हजार ८७२ हेक्टरवरील तर १३ हजार ८०५ हेक्टरवरील उभ्या पिकाचा समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ात १६ हजार ३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. म्हणजेच या वर्षी ३८ हजार ३०० हेक्टरील शेती या वर्षी नष्ट झाली. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने बंपर भात उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीने आणि ऑक्टोबर महिन्यात कयार वादळाच्या प्रभावामुळे पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. हाताशी आलेले पीक नष्ट झाले. कोकणात शेतीतून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असते. खरिपाची लागवड सोडली तर फारसे दुबार पीक होत नाही. अशा परिस्थितीत शेतातील उभे पीक नष्ट झाल्याने, शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक मदतीची मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ५७ हजार ३२३ हेक्टरवर भातपीक घेतले जाते. यापैकी ३२ हजार ३२२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने १०८ कोटी ३७ लाख रुपयांचा नुकसानभरपाईचा प्रस्ताव तयार केला आहे. आधी ‘कयार’ आणि नंतर ‘माहा’ चक्रीवादळाचा शेतीला तडाखा बसला. यात सुमारे ७३ हजार ४०३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. चक्रीवादळांमुळे शेतीप्रमाणेच मासेमारी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. हे नुकसान १४ कोटी ६४ लाख रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर मच्छीमारांनाही आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सुपारीचे उत्पादन अतिवृष्टीमुळे घटणार

रायगड जिल्ह्य़ास अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांत मोठय़ा प्रमाणात सुपारीचे उत्पादन घेतले जाते. या सुपारीला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे सुपारीची निर्यातही केली जाते. यातून साधारणपणे सहा ते सात कोटींची उलाढाल होत असते. वर्षांतून एकदाच या सुपारीचे उत्पादन होत असते. मात्र यंदा कोकण किनारपट्टीवर झालेल्या अतिवृष्टीचा सुपारी पिकावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे सुपारी पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सुपारीचे फळ गळून पडण्याचे प्रमाण वाढले. बुरशीनाषकांची फवारणी करूनही उपयोग होत नाही. त्यामुळे बागायदार धास्तावले आहेत. यंदा सुपारीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत भाताचे नुकसान’ ‘कयार’ वादळाच्या प्रभावामुळे झालेल्या अतिवृष्टीने रत्नागिरी जिल्ह्य़ातील भात, नागली पिकांच्या नुकसानीचा आकडा २६ कोटी ७५ लाखांवर पोहचला आहे. ७९ हजार १४५ हेक्टरपैकी ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. पंचनामे पूर्ण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट केले असले तरीही अजून काही गावांमध्ये पंचनाम्यांचे काम सुरू आहे. यामध्ये आणखीन भर पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

* दसऱ्यानंतर ‘कयार’ वादळ सुरू झाले. सलग १० दिवस कोकण किनारपट्टीसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. गरवे, निमगरव्याची कापणी रखडल्यामुळे भातकापणी अतिवृष्टीत सापडले. ते भिजून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका वार्षिक उत्पादनावर होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून ५३ हजार ९३७ शेतकऱ्यांचे ११ हजार ७०६ हेक्टरचे नुकसान झाले आहे. सर्वच्या सर्व भातशेतीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. प्राप्त अहवालानुसार काढणी पश्चात नुकसान झालेले शेतकरी १५,९८० इतके आहेत. त्यांच्या ३२३० हेक्टरचे नुकसान झाले असून ३७,९५७ शेतकऱ्यांच्या मळ्यातील उभ्या पिकांना फटका बसला. ते क्षेत्र ८,४७५ हेक्टर आहे. पंचनामे पूर्ण झालेल्या क्षेत्रापैकी विमा संरक्षित ३०५ शेतकऱ्यांच्या १४०.८५ हेक्टरची नोंद झाली आहे.

* नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या कालावधीत बहुतांश कर्मचारी सुट्टीवर होते. त्यामुळे अनेक गावांमध्ये पंचनामे सुरू करण्यास विलंब झाला. प्रत्यक्ष शेतावर जाऊन ही कार्यवाही करावयाची असल्याने पंचनामे आटोपणे अशक्य होते. काही गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही सुरूच असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अजून दोन दिवसांमध्ये पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण होईल.