राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूरमधील राजकीय वर्चस्वाला सोमवारी मोठा धक्का बसला. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसप्रणित कर्मयोगी शंकरराव पाटील शेतकरी विकास पॅनलचा धक्कादायक पराभव झाला आहे. बाजार समितीच्या १९ जागांपैकी १६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनल विजय मिळवला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकमेकांवर प्रथमच जाहीर टीका केल्यामुळे यंदा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. त्यामुळे संचालक मंडळाच्या एकोणीस जागांसाठी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांनी स्वत:ची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, आजचा निकाल हा अनेकांसाठी धक्कादायक होता. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून हर्षवर्धन पाटील यांच्या गटाचे बाजार समितीवर एकहाती वर्चस्व होते. मात्र, आजच्या निकालांनी हे वर्चस्व पूर्णपणे मोडीत निघाले आहे.

या निवडणुकीत तब्बल ९८ टक्के मतदान झाले. पळसदेव येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले होते. अजित पवार यांनी या निवडणुकीच्या प्रचारार्थ इंदापुरात बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांनीही जाहीरपणे उत्तर दिले होते. अजित पवार यांच्यामुळेच आघाडीची सत्ता गेल्याची जाहीर टीका त्यांनी प्रथमच केली होती. एकमेकांवरील या टीकेमुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. याशिवाय, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रसेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसने याठिकाणी १९ जागा जिंकल्या. तर दौंड तालुक्यात विद्यमान आमदार राहुल कूल यांनाही पराभवाचा झटका बसला. माजी आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने १९ जागा जिंकून बाजार समितीची एकहाती सत्ता मिळवली आहे.

Chhagan Bhujbal Hemant Godse and other Political leaders gather in Kalaram temple
नाशिक : काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची लगबग
Mohite-Patil, Mohite-Patil family revolt,
मोहिते-पाटील कुटुंबीयांचे २१ वर्षांनंतर पुन्हा बंड !
Dhairyasheel Mohite Patil
धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडली!, शरद पवार गटात जाणं जवळपास निश्चित, माढ्यात घडामोडींना वेग
Praniti Shinde
मी उमेदवार आहे माझ्याशी भिडा; वडिलांवर कसली टीका करता ? प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान