22 January 2021

News Flash

करोना संकटातही अमोल गो-हे यांनी रोखला नाही भाजीपुरवठा, नोकरी गेलेल्यांसाठी निर्माण केली संधी

अमोल गो-हे यांनी संकटातही शोधली संधी

– पार्थसारथी बिस्वास 

26/11 Stories of Strength: करोना संकटामुळे अनेकांना भविष्यासाठी केलेल्या त्यांच्या योजना गुंडाळाव्या लागल्या. लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातच्या नोकऱ्या तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. अमोल गो-हे यांनीही आपला ग्रीनफिल्ड अॅग्रो लिमिटेड व्यवसाय वाढवण्याचा ठरवलं होतं पण त्यातच लॉकडाउन लागला. मात्र या संकटाच्या काळातही अमोल गो-हे यांनी संधी सोधत नाशिकमधील शेतातून ताज्या भाज्यांचा पुरवठा सुरु ठेवला. नवी मुंबई आणि ठाण्याला त्यांच्या भाज्या पोहोचत होत्या. यामुळे गरज असणाऱ्या लोकांना मदत तर मिळालीच पण अनेकांच्या हाती रोजगारही राहिला.

२०१६ पासून प्रत्येक वर्षी इंडियन एक्स्प्रेस २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतींना बातम्यांच्या तसंच कार्यक्रमाच्या माध्यमातून उजाळा देत असतं. हल्ल्यात मोलाची कामगिरी निभावणाऱ्या जवानांचं, सर्वसामान्यांचं शौर्य तसंच त्याचून बचावलेल्यांची जीवनगाथा मांडण्याचा प्रयत्न असतं. पण यावेळी सध्या एका वेगळ्याच संकटाला सर्वजण तोंड देत असून यावेळी काही सर्वसामान्य लोक मोलाची कामगिरी बजावत आहेत.

नाशिकमधील अमोल गो-हे यांनी २०१२ मध्ये ग्रीनफिल्ड अॅग्रोची सुरुवात केली होती. “स्थानिक ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आणि निरोगी भाज्या उपलब्ध होत नसल्याचं माझ्या लक्षात आलं. अशा उत्पादनासाठी अनेकदा परदेशी बाजारपेठांवर अवलंबून राहावं लागतं,” असं ते म्हणतात.

अमोल गो-हे यांना व्यवसाय सुरु केल्यानंतर चांगलं यश मिळालं. ७० लाखांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न त्यांना मिळालं. “आता आम्ही अॅपच्या आधार सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामधून लोक आधीच आपली ऑर्डर देतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात काय पिकवायचं आहे हे ठरवता येईल,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यानंतर पुरवठा अचानक थांबला. राज्य सरकारने ग्रीनफिल्ड अॅग्रोसारख्या कंपन्यांना पुढे येण्याचं आवाहन केलं. आव्हान खूप मोठं होतं पण आमची इच्छा आणि काम चांगलं असल्याने सरकारने आमच्यावर विश्वास दाखवला,” असं अमोल गो-हे सांगतात.

करोना संकट नव्याने आलं असताना आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असताना डिलिव्हरी बॉय, चालक आणि इतरांच्या सुरक्षेला अमोल गो-हे यांनी प्राथमिकता दिली. ग्रीनफिल्ड अॅग्रोमध्ये मास्क, सॅनिटायजर, ग्लोव्ह्ज हे बंधनकारच करण्यात आलं होतं. याशिवाय कर्मचाऱ्यांना रस्त्यात कुठेही थांबावं लागू नये यासाठी पाण्याच्या बाटल्या आणि सोबत डबाही दिला जात होता.

“अनेकदा आमचे कर्मचारी करोना संशयित रुग्ण असणाऱ्या इमारतींमध्ये जायचे. सोसायटी त्यांच्या इमारतीत करोना रुग्ण आहेत हे अनेकदा लपवून ठेवत असत,” असं अमोल गो-हे यांनी म्हटलं आहे. ग्रीनफिल्डकडून दिवसाला जवळपास तीन ते चार टन फळ, भाज्या आणि डाळींचा पुरवठा करण्यात आला.

लॉकडाउनच्या काळात वृत्तपत्रं बंद असल्याने डिलिव्हरी करणाऱ्या अनेक मुलांच्या हातचं काम गेलं होतं. यामुळे अमोल गो-हे यांनी त्यांना नोकरी देण्याचं ठरवलं. “आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं आणि आता त्यांना इतर ठिकाणांहूनही नोकरीसाठी ऑफर येत आहेत,” अशी माहिती अमोल गो-हे यांनी दिली आहे.

आपल्या टीममधील एकाही व्यक्तीला करोनाची लागण झाली नसल्याचं अमोल गो-हे अभिमानानं सांगतात. लॉकडाउनमुळे आपल्याला नवा अनुभव मिळाल्याचंही ते म्हणतात. “आपल्या जीवनपद्धतीकडे नव्याने पाहण्याची आणि गरजेच्या गोष्टींव लक्ष देण्याची गरज आहे,” असं अमोल गो-हे म्हणतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 9:19 am

Web Title: nashik businessman amol gorhe keeps supply of fresh supplies from fields to doorsteps sgy 87
Next Stories
1 महाविकास आघाडी सरकार जनमताविरुद्ध असतं तर…; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर शरसंधान
2 हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला
3 Video : सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांची ‘अभिनंदन मुलाखत’
Just Now!
X