कालपर्यंत सेना- भाजप वेगवेगळे लढण्याची भाषा करत होते परंतु राज्यात आणि देशात पराभवाच्या भीतीने सेना भाजपची युती झाल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. सेना – भाजपच्या युतीवर नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.

आज दोघेही एकत्र आले असले तरी राज्यातील जनता यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की आहे असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. हे दोघेही एकत्र आल्यानंतर सरकारविरोधी मतदानामध्ये विभाजन होणार नाही. १९९८ मध्ये सेना – भाजप सत्तेत असताना कॉंग्रेसच्या आघाडीला ३८ जागी लोकांनी निवडून दिले होते. तीच परिस्थिती आज राज्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तीच परिस्थिती येणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. पहले मंदीर फिर सरकार असा नारा देणारी शिवसेना, चौकीदार चोर आहे म्हणणार्‍या शिवसेनेला याच जाब जनता विचारल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे दोघेही एकत्र आले असले तरी यांचा पराभव निश्चित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

भारतीय जनता पार्टी व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील, असा निर्णय सोमवारी मुंबईत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व प्रकाश जावडेकर, शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. या युतीबद्दल बोलताना सामान्य माणसांचं, तळागाळातल्या लोकांचं, शेतकरी बांधवांचं हित राखण्यासाठी आम्ही घेतला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत लवकरात लवकर झालंच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती जी आम्ही मान्य केली आहे असंही भाजपाने सांगितलं.