28 September 2020

News Flash

राष्ट्रवादीला आणखी धक्का; रामराजेंनी घड्याळ सोडलं, शिवबंधन बांधणार

रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला लागलेली गळती सुरूच आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण येथील निवासस्थानी गुरुवार सायंकाळी झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत रामराजे आपला निर्णय जाहीर करणार आहेत.

फलटण येथे झालेल्या बैठकीला रामराजे, संजीवराजे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, सदस्य दत्ता अनपट, बाळासाहेब सोळस्कर, मंगेश धुमाळ यांच्यासह फलटण मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून रामराजेंच्या पक्षांतराच्या चर्चा होत्या. अखेरीस गुरूवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच अडचणीत आली आहे.

दरम्यान, गुरूवारी सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनीही राष्ट्रवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका दिवसांत राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के बसल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे भाजपात प्रवेश करणार आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ते शनिवार १४ सप्टेंबर रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 6:27 am

Web Title: ncp ramraj naik nimbalkars decide join shivsena nck 90
Next Stories
1 विसर्जनाला गणेश भक्तांवर विघ्न; राज्यात १९ जणांना जलसमाधी
2 खासदार उदयनराजेंचं अखेर ठरलं, भाजपा प्रवेशाचा मुहूर्त झाला निश्चित!
3 उदयनराजे भाजपात नक्की येणार, मुख्यमंत्री सतत त्यांच्या संपर्कात – चंद्रकांत पाटील
Just Now!
X