तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरातील विठ्ठलाचेही टोकन पद्धतीने दर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली. एरवी एकदाशीच्या काळात सुमारे २० ते २५ तास दर्शन रांगेत उभे राहून भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते. परंतु, मंदिर समितीच्या या निर्णयामुळे भाविकांची या त्रासातून मुक्तता होणार आहे. येत्या कार्तिकी वारीपासून याची सुरूवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही भोसले यांनी सांगितले.

मंदिर समितीने घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे भाविकांना विठुरायाचे दर्शन घेणे सुलभ जाणार आहे. या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार असल्याने उरलेल्या वेळेत तो भाविक पंढरपूरच्या बाजारपेठेत फेरफटका मारू शकतो. खरेदी व इतर भागाचे पर्यटन करण्यास त्याला मोकळा वेळ मिळणार आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेलाही चालना मिळेल, असे भोसले यांनी म्हटले. भाविकांची सोय कशी होईल. दर्शन रांगेत थांबण्याचा कालावधी कसा कमी करता येईल, याचा विचार करून हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणलो.

shivar lokarang article, shivar loksatta
शिवाराच्या दयनीय अवस्थेचे चित्र…
Famous Odissi Dancer Jhelum Paranjape article on International Dance Day
नृत्याविष्कार!
nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?

बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात टोकन देणारे स्टॉल समिती उभारणार असून दर्शनासाठी आलेल्या भाविकाला प्रथम आपल्या दर्शनाचे टोकन घ्यावे लागणार आहे. या व्यवस्थेनंतर आता ऑनलाईन दर्शन व्यवस्था आणि मुखदर्शन व्यवस्थेचा देखील विचार केला जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.