24 February 2021

News Flash

अकोल्यात आणखी एक मृत्यू; नऊ रुग्णांची भर

अकोल्यात रुग्णसंख्या ५१६

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : अकोल्यात आणखी एक जणाचा मृत्यू व नऊ नवीन रुग्णांची नोंद गुरुवारी करण्यात आली. आज एका ८० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ते फिरदोस कॉलनी येथील रहिवासी होते. या रुग्णाला १५ मे रोजी दाखल करण्यात आले होते. १७ मे रोजी करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला होता. आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आज नऊ नवीन रुग्णाची भर पडल्याने एकूण रुग्ण संख्या ५१६ झाली आहे.

२९ जणांचा मृत्यू झाला असून, ३४९ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात रुग्णालयातून आज सोडण्यात आलेल्या ३४ जणांचा समावेश आहे. आज २०१ नमुन्यांचे अहवाल आले. त्यात १९२ नकारात्मक आले. नऊ सकारात्मक आढळलेल्या रुग्णांमध्ये सात पुरुष व दोन महिला आहेत. हे रुग्ण सोनटक्के प्लॉट, सनगर कॉलनी वाशीम बायपास, राऊतवाडी, गायत्री नगर कौलखेड, सिंधी कॅम्प, कमला नेहरू नगर, हरिहरपेठ, तेलीपूरा, गोरक्षण रोड मलकापूर भागातील रहिवासी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 9:10 pm

Web Title: one more death in akola 9 new patients positive scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रात आतापर्यंत १८६१६ करोना रुग्णांना डिस्चार्ज
2 “आगामी काळात विलगीकरणासाठी शाळा इमारती देवू नका”
3 रिअल इस्टेट सेक्टर अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं, त्याच्याकडे लक्ष द्या; शरद पवारांचं मोदींना पत्र
Just Now!
X