25 September 2020

News Flash

कारागृहातून सुटलेल्या पडळकरांची मिरवणूक

राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांची कारागृहातून जामिनावर सुटका होताच समर्थकांनी मंगळवारी सांगलीसह तासगाव, आटपाडीत जल्लोषात मिरवणूक काढली.

| August 20, 2014 03:00 am

राष्ट्रीय समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांची कारागृहातून जामिनावर सुटका होताच समर्थकांनी मंगळवारी सांगलीसह तासगाव, आटपाडीत जल्लोषात मिरवणूक काढली. सांगलीपासून आटपाडीपर्यंत श्री. पडळकर यांच्यासमवेत १०० मोटारसायकलस्वारांनी रॅली काढून स्वागत केले. सांगली कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजीही केली.
मे महिन्यात खरसुंडी ता. आटपाडी येथे एका विवाह समारंभात झालेली मारामारी आणि यासंदर्भात तक्रार देणाऱ्याविरुद्ध खुनी हल्ला केल्याप्रकरणी श्री. पडळकर यांच्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ते पोलिसात हजर झाले होते. गेले एक महिना ते न्यायालयीन कोठडीत होते.
सत्र न्यायालयाने त्यांना काल जामीन मंजूर केल्यानंतर मंगळवारी त्यांची मुक्तता झाली. त्यांच्या सुटकेनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तासगाव आणि आटपाडी येथेही समर्थकांनी घोषणाबाजी करीत त्यांची मिरवणूक काढली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2014 3:00 am

Web Title: padalkars procession when he released on bail
टॅग Bail,Released
Next Stories
1 नरभक्षक ‘ठरवून’ वाघाची हत्या
2 अबब! ३६ वर्षांनी आईच्या पोटातून बाळाचा सांगाडा काढला!
3 ‘गोविंदा रे गोपाळा’च्या गजरात कोल्हापुरात दहीहंडीचा थरार
Just Now!
X