पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला. अखेर अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार ७१६ मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेचा मुद्दा केली होती. पंढरपूर निवडणुकीत जनतेने ठाकरे सरकारविरोधात कौल दिल्याची पहिली प्रतिक्रिया अवताडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय.

मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मतं मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मतं मिळाली आहेत.

mahayuti in campaign, Mahavikas Aghadi,
महायुतीतील दिग्गज प्रचारात, तर महाविकास आघाडीत मोठ्या सभेची प्रतीक्षाच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्यांदा यवतमाळात येणार
Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
Dindori, Sharad Pawar
दिंडोरीतून मार्क्सवाद्यांच्या माघारीने शरद पवार गटाला बळ
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त

पहिली फेरी
समाधान अवताडे – २ हजार ८४४
भगीरथ भालके – २ हजार ४९४
आघाडी – अवताडे (४५० मतं)

दुसरी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ६४८
भगीरथ भालके – ३ हजार ११२
आघाडी – भालके (५०० हून आधिक)

तिसऱ्या फेरीनंतरची एकूण मतं
समाधान अवताडे – ७ हजार ९७८
भगीरथ भालके – ८ हजार ६१३
आघाडी – भालके (६३५ मतं)

चौथी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार ३२५ (एकूण मतं – ११ हजार ३०३)
भगीरथ भालके – ३ हजार ३२८ (एकूण मतं – ११ हजार ९४१)
आघाडी – भालके (६३८ मतं)

पाचवी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ७५६ (एकूण मतं – १४ हजार ५९)
भगीरथ भालके – २ हजार ७७६ (एकूण मतं – १४ हजार ७१७)
आघाडी – भालके (७०० हून अधिक)

सहावी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार १५९ (एकूण मतं – १७ हजार २१८)
भगीरथ भालके – २ हजार ६९५ (एकूण मतं – १७ हजार ४१२)
आघाडी – भालके (१९४ मतांनी)

सातवी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ९९५ (एकूण मतं – २० हजार २१३)
भगीरथ भालके – १ हजार ९६८ (एकूण मतं – १९ हजार ३८०)
आघाडी – अवताडे (८३३ मतांनी)

आठवी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार २८७ (एकूण मतं – २३ हजार ५००)
भगीरथ भालके – १ हजार ९५४ (एकूण मतं – २१ हजार ३३४)
आघाडी – अवताडे (२ हजारांहून अधिक मतांनी)

नववी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ७५५ (एकूण मतं – २६ हजार २५५)
भगीरथ भालके – २ हजार ६९३ (एकूण मतं – २४ हजार २७)
आघाडी – अवताडे (२ हजार २०० हून अधिक मतांनी)

दहावी फेरी
समाधान अवताडे – २ हजार ५२१ (एकूण मतं – २८ हजार ७७६)
भगीरथ भालके – ३ हजार १०६ (एकूण मतं – २७ हजार १३३)
आघाडी – अवताडे (१ हजार ६०० हून अधिक मतांनी)

सतरावी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार १८८ (एकूण मतं – ४९ हजार १२२)
भगीरथ भालके – ३ हजार ६६० (एकूण मतं – ४८ हजार ३६७)
आघाडी – अवताडे (७५५ मतांची आघाडी)

२५ वी फेरी
समाधान अवताडे – ३ हजार ४८९ (एकूण मतं – ७५ हजार ७३)
भगीरथ भालके – ३ हजार २११ (एकूण मतं – ६८ हजार ७३९)
आघाडी – अवताडे (६ हजार ३३४ मतांनी)

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ असेल, याची उत्सुकता सध्या लागली आहे. त्याशिवाय, स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाल्याचं दिसून आलं.

भाजपा वि. महाविकासआघाडी थेट सामना!

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

West Bengal Election 2021 Result Live Updates: सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल आघाडीवर

३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न ठरला मुद्दा!

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेचा आणि राजकीय सभांचा विषय ठरला होता. त्याशिवाय, राज्यातील करोनाच्या संकटाची हाताळणी हा मुद्दा भाजपाकडून मोठा करण्यात आला होता. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींचा तुटवडा आणि पुरवठा या मुद्द्यांवरून दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं दिसून आलं.

निवडणूक काळात पंढरपुरात करोना वाढला!

पंढरपूरमध्ये १ एप्रिल रोजी केवळ ४६ रुग्ण आढळून आले होते. मात्र पुढे १७ एप्रिल रोजीच्या मतदानाअगोदर प्रचार काळापासून यामध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसून आले. तालुक्यात १५ एप्रिल रोजी – १७१, १६ एप्रिल – २४८, १७ एप्रिल – २१०, २३ एप्रिल रोजी ३०९, २४ एप्रिल – ३१०, २५ एप्रिल -३३३, २६ एप्रिल – २९९ अशी रोज रुग्णसंख्या वाढताना दिसून आली. मार्च महिन्यात तालुक्यात केवळ ७०५ रुग्ण आढळले होते. हीच संख्या एप्रिल महिन्यात २६ एप्रिलपर्यंत थेट ३१४६ वर पोहोचली. मार्च महिन्यात संसर्गाचा दर हा ७.०६ टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढून १४.९५ टक्क्यांवर गेला.