अंधश्रद्धा सामान्य माणसांमध्येच असते असं नाही बऱ्याचदा शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात असं मत अणू शास्त्रज्ञ आणि अणू उर्जा मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकडोकर यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ३० व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात अनिल काकोडकर यांनी त्यांचे विचार प्रकट केले. अनेकदा शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात असे त्यांनी म्हटलं आहे.

अंधश्रद्धेची मुळं समाजात रुतून बसली आहे. विविध सामाजिक स्तरांवर आणि पातळ्यांवर ती वेगवेगळ्या पद्धतीने पसरली आहे. ९० च्या दशकात गणपती दूध पितो ही अफवा आणि अंधश्रद्धा कशी पसरली आणि त्यानंतर काय काय घडलं ते आपण पाहिलंच आहे असंही काकोडकर यांनी म्हटलं आहे. तसेच सामान्य माणसेच नाही तर शास्त्रज्ञही अंधश्रद्धाळू असतात असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे.

maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti offer cash reward for predict correctly voting
कंगना, गडकरी, राहूलना मते किती मिळतील ते अचूक सांगा, २१ लाख रुपये बक्षिस मिळवा – अंनिसचे ज्योतिषांना आव्हान
loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या तीस वर्षांपासून जास्त काळ अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करते आहे. या प्रयत्नाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ही अंधश्रद्ध निर्मूलन समिती स्थापन केली त्याचा गौरव वाटतो असेही त्यांनी म्हटले आहे.