seveचंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील चरूर खटी येथील दुसऱ्या वर्गात शिकणारा अनुज किरण ठाकरे या 8 वर्षीय मुलाचा गिट्टी खदाणीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.  मृतक मुलगा काल सायंकाळी आपल्या वडिलांसोबत बैलबंडी वर बसुन शेतात गेला होता, वडिलांनी शेतालगत असलेल्या गिट्टी क्रेशर मधील खदानीतील साठवुन असलेल्या पाण्यात बैलांना पाणी पिण्यासाठी नेले असता, वडिलांसोबत त्याचा मुलगा सुद्धा गेला होता. त्याचवेळी त्या मुलाचा खदानीतील खड्यात पाय घसरल्याने पाण्यात बुडाला.

वडिलाला पोहणे येत नसल्याने अखेर आवाज केल्याशिवाय उपाय नव्हता, शेवटी त्या चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला.
सदर खदान सुनील सारडा यांच्या मालकीची असून खदानीत पाणी भरून असल्याने खदान मालकाने सवंरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करणे आवश्यक होते ते नसल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हळहळ व्यक्त होत आहे. वरोरा पोलीस घटनेची चौकशी करीत आहे.