आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात आस्था नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीन नव्या कृषी कायद्यावरुन मोदी सरकारवर तोफ डागली. कृषी कायदे रद्द करण्यासाठी मागच्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज मुंबईच्या आझाद मैदानात शेतकऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

आणखी वाचा- “ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना देशातील कष्टकऱ्यांबद्दल कवडीची आस्था नाही”

या सभेला महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिला असून शरद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. थंडी, वाऱ्याची पर्वा न करता मागच्या ६० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाला बसला आहे.

आणखी वाचा- “तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव”

पंतप्रधानांनी त्याची साधी चौकशी केली का ? पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? पंजाबच्या शेतकऱ्यांनी स्वांतत्र्य लढयात महत्त्वाचे योगदान दिले आहे. चीन-पाकिस्तानविरोधात युद्ध लढलं आहे, असे शरद पवार म्हणाले. कायदा आणताना सविस्तर चर्चा केली पाहिजे, पण आम्हाला बोलू दिलं नाही असे सांगत कायदा मंजूर करण्याच्या प्रक्रियेवर टीका केली.