News Flash

शरद पवार यांच्या तोंडातील ‘अल्सर’ काढला; प्रकृती उत्तम

राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली माहिती

(फोटो सौजन्य स्क्रीनशॉर्ट)

“पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात तपासणीसाठी गेले असता, त्यांच्या तोंडात एक अल्सर आढळला असून तो काढण्यात आला आहे.” अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

तसेच, “शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते आता रुग्णालयात विश्रांती घेत आहेत. शिवाय देशभर पसरलेल्या करोनाच्या परिस्थितीचा आढावा देखील घेत आहेत. ते लवकरच आपले कामकाज पुन्हा सुरू करतील.” असा देखील विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, २१ दिवसांत तीन शस्त्रक्रिया

या अगोदर शऱद पवार यांना २१ एप्रिल रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. २१ दिवसांतील ही तिसरी शस्त्रक्रिया होती. त्या अगोदर ३० मार्चला पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. १२ एप्रिलला पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ते पुन्हा ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले होते.

निवासस्थानी घेतला होता करोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस – 
पहिल्या सर्जरीनंतर ७ एप्रिलला शरद पवार यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी विश्रांती घेत असताना त्यांनी हा डोस घेतला होता. यावेळी सुप्रिया सुळे, डॉक्टर लहाने उपस्थित होते. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत करोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 2:07 pm

Web Title: sharad pawars mouth ulcer removed nawab malik msr 87
Next Stories
1 “ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओनंतर धनंजय मुंडेंचा बहिणीसाठी काळजीयुक्त संदेश!
2 उद्योगांना कोविड केंद्रासाठी सामाजिक दायित्व निधीस परवानगी
3 धाराशिव कारखान्यात प्राणवायू निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्प
Just Now!
X