16 January 2021

News Flash

आत्महत्याग्रस्त शेतक ऱ्यांच्या कुटुंबीयांना आपचा दिलासा

नापिकी, डोक्यावरील कर्ज यामुळे आलेल्या आíथक दुष्टचक्रातून आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे.

| August 20, 2015 01:20 am

नापिकी, डोक्यावरील कर्ज यामुळे आलेल्या आíथक दुष्टचक्रातून आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे. आतापर्यंत आत्महत्याग्रस्त ८ शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण खर्चासाठी ‘आप’च्या वतीने एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. बारावीचे शिक्षण होईपर्यंत प्रत्येक वर्षी १२ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबीयांना हा मोठा दिलासा मिळाला आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची आíथक स्थिती बिकट होत असल्याचे लक्षात घेऊन अनेक विद्यार्थी शिक्षणाचा नाद सोडून देण्याच्या मानसिकतेत असतात. ही बाब लक्षात घेऊन ‘आप’ने शेतक ऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी आíथक हातभार लावण्याचे ठरविले. जिल्ह्यात आतापर्यंत ८९ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून मृत्यूला कवटाळले. मागील ३ वर्षांपासून जिल्ह्यात पडलेला दुष्काळ, त्यामुळे शेतकऱ्यांना कसलेही उत्पन्न मिळाले नाही. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा खर्च, सावकाराची व बँकेची देणी यामुळे आíथक विवंचनेतून कोणी विषप्राशन करून, कोणी गळफास घेऊन तर कोणी पेटवून घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार ९० झाली आहे. यातील ४१ शेतकरी कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने आíथक मदत दिली आहे. परंतु उर्वरित शेतकऱ्यांना आíथक मदत मिळाली नसल्याने अशी कुटुंबे आíथक अडचणीत सापडली आहेत.
सरकारचे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत असलेले उदासीनतेचे धोरण व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची समस्या लक्षात घेऊन आम आदमी पक्षाच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील सुदर्शन बाकले (सारोळा), नारायण िशदे (आरणी), पोपट गाढवे (वरूडा), नामदेव पडवळ (सारोळा), स्वराज पांचाळ (ढोकी), परंडा तालुक्यातील सुरेश चोबे (कांदळगाव), इनगोंदा येथील आदिनाथ राऊत, मोहन सुरवसे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीच्या नावे प्रत्येकी १२ हजार रुपयांची मदत त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी देण्यात आली. मदतीचे आणखी २० प्रस्ताव पक्षाकडे पाठविले आहेत. या साठी जिल्हाध्यक्ष प्रा. मारुती कारकर, मार्गदर्शक केरबा गाढवे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष अॅड. अजित खोत, जिल्हा सचिव अरुण बोबडे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 1:20 am

Web Title: solace to farmer suicide affecting family by aap
टॅग Osmanabad
Next Stories
1 दुष्काळाच्या दाहकतेमुळे शेतमजुरांचे स्थलांतर
2 तुरीला क्विंटलला विक्रमी अकरा हजार रुपये भाव
3 साधुग्राम प्रवेशद्वाराला विविध संदर्भाचे कोंदण
Just Now!
X