28 February 2021

News Flash

चिंताजनक, सोलापुरात पुन्हा ७४ करोनाबाधित रूग्ण आढळले

एकूण रूग्णसंख्या ८२२

सोलापुरात काल रात्री एकाचवेळी ८१ करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर सोलापूरकरांची चिंता वाढली असताना आज दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत पुन्हा ७४ नव्या रूग्णांची पडल्यामुळे अधिकच भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत ७२ रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. एकूण रूग्णसंख्या ८२२ इतकी झाली आहे.  मात्र तरीही करोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्याही ३२१ वर गेल्यामुळे तेवढाच दिलासा मिळाला आहे.

आज, शुक्रवारी सकाळी करोनाशी संबंधित १६६ चाचणी अहवाल प्राप्त झाले असता त्यात ६० पुरूष व १४ महिलांसह ७४ पॉझिटिव्ह रूग्ण सापडले. काल रात्री ८१ रूग्ण सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा ७४ रूग्णांची भर पडल्यामुळे सोलापूरकरांसाठी हा धक्कादायक बाब ठरली आहे. गेल्या पाच दिवसांतील करोना संकटाची स्थिती पाहिली असता २४ मे पासून आज सकाळपर्यंतचा रूग्णांची संख्या २५७ इतकी झाली आहे. तर मृतांची संख्याही २६ झाल्याचे दिसून येते.

सध्या आणखी सुमारे सहाशे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे रूग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. एकमेकांच्या थेट संपर्कात आल्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. दरम्यान, या गंभीर परिस्थितीत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे हे सोलापुरात दाखल झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2020 10:10 am

Web Title: solapur coronavirus update 74 new positive cases nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 … तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत : जितेंद्र आव्हाड
2 ही आमचीच लेकरं; या ग्रामपंचायतीने मुंबई-पुणेकरांना दिलेली क्वारंटाइन वागणूक शिकण्यासारखीच
3 “…स्वतःच्या घरी तेच त्यांचं अखेरचं जेवण”, वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक
Just Now!
X