News Flash

भारताची संस्कृती आणि वारसा अभ्यासकांसाठी चांगली संधी; शासनाचा मुंबईत अभ्यासक्रम

या अभ्यासक्रमासाठी विषयाची आवड असणं आवश्यक आहे

आपला भारत हा महान परंपरा आणि इतिहास असलेला देश आहे. याच अनुषंगाने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचलनालय यांच्या सहकार्याने होरायझन्स सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या गेली १२ वर्षे कार्यरत असलेल्या अस्थापनाने आपली संस्कृती, आपला वारसा यासंदर्भातला सहा महिने कालावधीच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला आहे. आपली संस्कृती, इतिहास याविषयीची सखोल माहिती करुन देणारा ‘प्राचीन भारतीय संस्कृतीबंध’ हा सहा महिने कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम ३ नोव्हेंबरपासून सुरु होतो आहे.

या अभ्यासक्रमात प्रागैतिहासिक इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, भाषा, किल्ले, मंदिरं या विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. दर शनिवारी पाच ते आठ या वेळेत पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयाचे कार्यालय, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे आवार, छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी हे वर्ग सुरु राहतील. या अभ्यासक्रमासाठी शिक्षणाची अट नाही. केवळ विषयाची आवड असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर डॉ. मिलिंद पराडकर यांच्याशी ९६१९००६३४७, ८१६९४४८७५७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 5:28 pm

Web Title: special certificate course for indian culture and history by archaeology department maharashtra government scj 81
Next Stories
1 …म्हणून ‘या’ मतदारसंघात केवळ एकाच मतदाराने केलं मतदान !
2 हुबळी स्फोट : रेल्वेतून आलेल्या ‘त्या’ पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव
3 साताऱ्यात असं काही घडलंच नाही; निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Just Now!
X