11 July 2020

News Flash

तंबाखू, गुटखा खाणाऱ्या शिक्षकांवर आता निलंबनाची कारवाई

शाळेच्या २०० मीटर परिसरात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

शाळेच्या २०० मीटर परिसरात बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पालघर : शाळेच्या परिसरात तंबाखू खाणाऱ्या शिक्षकास नोकरीवरून निलंबित करण्यात येणार, असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. शाळेच्या दोनशे मीटर परिसरात जर कुणी शिक्षक गुटखा किंवा तंबाखू खाताना आढळून आल्यास त्या शिक्षकास त्वरित नोकरीवरून निलंबित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या विविध विषयांवर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समन्वय सभेमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेत असताना जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी तसे आदेश दिले. पालघर जिल्ह्य़ातील सर्व शाळा १०० टक्के तंबाखूमुक्त झाल्या पाहिजेत पण त्या दृष्टीने योग्य ते प्रयत्न झाले पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या. या वेळी आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेताना राज्यात पालघर जिल्ह्य़ाचा प्रथम क्रमांक असून याच गतीने काम कायम ठेवून लवकरात लवकर आपले ध्येय पूर्ण करावे तसेच यासंदर्भात दर १५ दिवसांनंतर जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून आढावा घेण्यात यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.

बालकांमध्ये आजारपणात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’ ही लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत असून या योजनेचा आढावा घेण्यात आला. वेळी डिसेंबरपासून चार महिने राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेत जिल्हा स्तरावर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राचे पूर्ण सर्वेक्षण करून वंचित राहिलेल्यांचा शोध घेऊन या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात यावी, असे  निर्देश त्यांनी या वेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2019 1:01 am

Web Title: teachers chewing tobacco ghutka will suspended zws 70
Next Stories
1 गोड बातमी लवकरच मिळेल, पेढ्यांची ऑर्डर गेलीय असं समजा – संजय राऊत
2 चर्चा अंतिम टप्प्यात, राज्याला लवकरच स्थिर सरकार मिळेल – पृथ्वीराज चव्हाण
3 केंद्रीय पथक उद्या राज्याच्या दौऱ्यावर; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी
Just Now!
X