27 January 2021

News Flash

जादूटोण्याला लगाम: नाशिकमध्ये नरबळीच्या प्रयत्नातील दोघांना अटक

घरातील आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना शुक्रवारी नाशिकमध्ये पोलिसांनी अटक केली.

| September 6, 2013 05:47 am

घरातील आजारी व्यक्तीला बरे करण्यासाठी नरबळी देण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना शुक्रवारी नाशिकमध्ये पोलिसांनी अटक केली. अन्य दोन महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिल्यावर त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कायद्यात काही ‘जादूटोणा’ नाही!
बुधवारी रात्री नाशिक रोडमधील देवळालीगाव भागातील एका घरामध्ये खोदण्याचा आवाज येत होता. त्यानंतर गुरुवारी रात्रीही त्याच घरातून पुन्हा एकदा खोदकाम सुरू असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. स्थानिक लोकांना तिथे जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी घरात सात फूट खोल खड्डा खणला असल्याचे दिसून आले. त्यामध्ये एक महिला आणि चार मुले बसल्याचे आढळले. या सर्वांच्या डोक्यावर लिंबू ठेवले होते आणि त्यावर कुंकू लावले होते. मुलांच्या गळ्यात ताईतही घालण्यात आले होते. याप्रकरणी स्थानिक नागरिक बाळासाहेब युवराज यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जितेश भालेराव, विजय भालेराव या दोघांना अटक केली असून, सुनीता मोगल आणि संगीता मोगल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
असे कायदे होती आणि अडगळीत पडती 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2013 5:47 am

Web Title: two arrested for human sacrifice bid in nashik
Next Stories
1 बैलपोळ्याच्या आनंदाला गालबोट
2 उत्पादक, संघटनांनीच उसाचा पहिला हप्ता ठरवावा : मुख्यमंत्री
3 संगणक साक्षरता यापुढे महत्त्वाची- मुख्यमंत्री
Just Now!
X