िहगोली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनासह पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणी परिसरात भ्रमणध्वनी वापरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी स्पष्ट केले.
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होणार आहे. गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेतर्फे गुरुवारी रंगीत तालीम घेण्यात आली. कुठेही अनुचित प्रकार होईल याची शक्यता वाटल्यास तत्काळ त्या संबंधीची माहिती देण्याबाबत संबिंधत यंत्रणेस सूचना केल्या असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. वॉकीटॉकीद्वारे नियंत्रण कक्षातून सूचना दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.
लातूरकरांची उत्सुकता शिगेला
वार्ताहर, लातूर
लातूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा यांनी मतमोजणी केंद्रास भेट देऊन विधानसभा मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणी केंद्राच्या पूर्वतयारीची पाहणी केली.
डॉ. शर्मा यांनी विधासनभा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्षातील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार व मतदान प्रतिनिधी यांच्या बठक व्यवस्थेची पाहणी केली. निवडणूक निरीक्षक कक्ष, प्रसारमाध्यम कक्ष, भोजन कक्ष, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करून इतर बाबी उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. दरम्यान, निकालाची लातूरकरांमध्ये मोठी उत्सुकता तयार झाली आहे.
मतमोजणी प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना डॉ. शर्मा यांनी दिल्या.
जालन्यात प्रशासन सज्ज
वार्ताहर, जालना
जालना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार असून, त्यासाठी ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर ही मतमोजणी होईल.
सहापैकी ५ विधानसभा मतदारसंघांत मतमोजणीच्या २२ फे ऱ्या होतील. बदनापूर विधानसभा मतदारसंघात मात्र २५ फे ऱ्या होणार आहेत. मतमोजणी परिसरात केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात असतील. या शिवाय ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तास आहेत. मतमोजणी केंद्राच्या तळमजल्यावर निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय असेल. माध्यम कक्ष व राखीव कर्मचाऱ्यांचीही व्यवस्था असेल. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर सूक्ष्म निरीक्षक असेल. हे निरीक्षक केंद्र सरकार, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी व कर्मचारी असतील. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. आर. नायक यांनी मतमोजणी केंद्रास भेट देऊन पूर्वतयारीची पाहणी केली.
परभणीत फेरीनिहाय निकाल जाहीर होणार
वार्ताहर, परभणी
परभणी लोकसभेची विधानसभा मतदारसंघनिहाय ६ हॉलमध्ये स्वतंत्र मतमोजणी होणार आहे. प्रत्येक हॉलमध्ये १४ टेबल असून एकाच वेळी ८४ मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येईल.
कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात येईल. साडेआठ वाजता मतदान यंत्रांतील मतगणना सुरू होईल. मतमोजणी २६ फेऱ्यांत पूर्ण होईल. जिंतूर २६, परभणी २१, गंगाखेड २६, पाथरी २५, परतूर २३, घनसावंगी २३ या प्रमाणे फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी १०० मतमोजणी पर्यवेक्षक, १०० सहायक, १०० अतिरिक्त सहायक व इतर व्यवस्थेसाठी २०० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी दिली. मतमोजणीसाठी १७ उमेदवारांनी ४३० प्रतिनिधींची नावे निवडणूक विभागाकडे दिली.
मतमोजणीसाठी विद्यापीठ परिसर व शहरात जवळपास ६०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. यात ४ पोलीस उपअधीक्षक, ५ निरीक्षक, ४० अधिकारी, ४०० पोलीस कर्मचारी, दंगा नियंत्रण पथक, वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आदी तनात केले आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत झाल्यामुळे निकालानंतर राजकीय कार्यकत्यार्ंत भांडण-तंटे होऊ शकतात, हे लक्षात घेता जिल्हाभरात राजकीय व्यक्तींच्या घराभोवती बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पुन्हा खैरे की आता पाटील?
प्रतिनिधी, औरंगाबाद
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना पुन्हा  खासदारकी मिळते की काँग्रेसचे नितीन पाटील निवडून येतात, हे उद्या (शुक्रवारी) दुपारी निश्चित होईल. सकाळी ९ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. तत्पूर्वी साडेसात वाजता मतपेटय़ा बाहेर काढल्या जातील. दुपारी दोनपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. गुरुवारी मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली. ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. निवडणूक निरीक्षक शालिनी मिश्रा यांनी शेंद्रा येथील औद्योगिक वसाहतीतील मतमोजणीच्या जागेची पाहणी केली. दिवसभर मतमोजणी कशी होईल, याचा सराव कर्मचाऱ्यांनी केला. औरंगाबाद लोकसभेसाठी ६१.९३ टक्के मतदान झाले. १५ लाख ८३६ पैकी ९ लाख ८२ हजार ७३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रिंगणात २७ उमेदवार असले, तरी लढत दुरंगीच झाल्याचे चित्र प्रचारादरम्यान होते.
वैजापूर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमीे, तर औरंगाबाद पश्चिममध्ये सर्वाधिक मतदान झाले. मतदानानंतर कोण निवडून येणार, याची चर्चा काही दिवस होती. त्यानंतर पैजा लागल्या. सट्टेबाजीही झाली. मोदी लाट खरेच आहे का, हेदेखील उद्या समजणार आहे. शिवसेनेचे उमेदवार खैरे यांनी नुकतीच भय्यू महाराजांची भेट घेतली. ते गुरुवारी औरंगाबादेत आले. दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले आहेत.

१) उस्मानाबाद</strong>
एकूण मतदारसंख्या :    १७ लाख ३२ हजार ५७४
(एकूण झालेले मतदान- ११ लाख १५ हजार ९९१) (६४.४१ टक्के)
एकूण उमेदवार :        २७
प्रमुख लढत :            डॉ. पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
                         प्रा. रवींद्र गायकवाड (शिवसेना)
                         मतदान केंद्रांची संख्या :   १ हजार ९७१
संवेदनशील मतदान केंद्रे : ११
२) लातूर
एकूण मतदारसंख्या :      १६ लाख ८२ हजार ६०७
(एकूण झालेले मतदान-    १० लाख ५४ हजार ६७७) (६५.६८ टक्के)
एकूण उमेदवार :          १८
प्रमुख लढत :             दत्तात्रय बनसोडे (काँग्रेस)
                          डॉ. सुनील गायकवाड (भाजप)
मतदान केंद्रांची संख्या :   १ हजार ८९८
संवेदनशील मतदान केंद्रे : २८
३) बीड
एकूण मतदारसंख्या :      १७ लाख ८५ हजार ९०२
(एकूण झालेले मतदान-   १२ लाख ३७ हजार ७२९) (६९.२६टक्के)
एकूण उमेदवार :          ३९
प्रमुख लढत :             गोपीनाथ मुंडे (भाजप)
                          सुरेश धस (राष्ट्रवादी काँग्रेस)
मतदान केंद्रांची संख्या :   २ हजार १६८
संवेदनशील मतदान केंद्रे : ३९
४) नांदेड
एकूण मतदारसंख्या :      १६ लाख ८ हजार २५३
(एकूण झालेले मतदान-   १० लाख १० हजार ४६६) (५९.९२ टक्के)
एकूण उमेदवार :          २३
प्रमुख लढत :             अशोक चव्हाण (काँग्रेस)
                          डी. बी. पाटील (भाजप)
मतदान केंद्रांची संख्या :  १ हजार ८६६
संवेदनशील मतदान केंद्रे : ३६
५) परभणी
एकूण मतदारसंख्या :      १८ लाख २ हजार ८९४
(एकूण झालेले मतदान-    ११ लाख ५९ हजार ३७५) (६४.३१ टक्के)
एकूण उमेदवार :          १७
प्रमुख लढत :             संजय जाधव (शिवसेना)
                          विजय भांबळे (राष्ट्रवादी)
मतदान केंद्रांची संख्या :   १ हजार ९७४
संवेदनशील मतदान केंद्रे : ६९
६) हिंगोली
एकूण मतदारसंख्या :      १५ लाख ६५ हजार ४९५
(एकूण झालेले मतदान-   १० लाख ४८ हजार ८९७)  (६६.१६ टक्के)
एकूण उमेदवार :          २७
प्रमुख लढत :            सुभाष वानखेडे (शिवसेना)
                          राजीव सातव (काँग्रेस)
मतदान केंद्रांची संख्या :   १ हजार ८७३
संवेदनशील मतदान केंद्रे : ४६
७) औरंगाबाद                 
एकूण मतदारसंख्या :       १५ लाख ८३६
(एकूण झालेले मतदान-    ९ लाख ८२ हजार ७३५ (६१.९३ टक्के)
एकूण उमेदवार :           २७
प्रमुख लढत :             चंद्रकांत खैरे (शिवसेना)
                          नितीन पाटील (काँग्रेस)
मतदान केंद्रांची संख्या :   १ हजार ७१३
संवेदनशील मतदान केंद्रे : ५०
८) जालना
एकूण मतदारसंख्या :    १६ लाख ९ हजार ३५०  
(एकूण झालेले मतदान- १० लाख ६५ हजार ४४३) ६६.२० टक्के
एकूण उमेदवार :          २२
प्रमुख लढत :             रावसाहेब दानवे (भाजप)
                          विलास औताडे (काँग्रेस)
मतदान केंद्रांची संख्या :   १ हजार ८४१
संवेदनशील मतदान केंद्रे :