वारली पेंटिंग ही आदिवासी समाजातील पारंपरिक चित्रकला आहे. थोडेसे प्रोत्साहन दिले तर ही चित्रकला आदिवासी समाजासाठी रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध करून देऊ शकते. यामुळे आदिवासी समाजाचे आर्थिक सक्षमीकरणही होऊ शकते. रायगड जिल्ह्य़ातील लोधीवली येथील आदिवासी महिलांनी नेमके हेच सिद्ध करून दाखवले आहे. वारली पेंटिंगच्या मदतीने त्यांनी रोजगारांच्या नव्या संधी निर्माण केल्या आहेत.
लाकडाच्या मोळ्या विकून चरितार्थ चालवणाऱ्या इंदू बाळू पवार यांना आज घरबसल्या रोजगार मिळाला आहे. त्यांना यातून चांगले उत्पन्नही मिळते आहे. आर्थिक सक्षमीकरणामुळे त्यांना घरातही मानाचे स्थान मिळाले आहे, त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे. ही किमया झाली आहे ती त्यांना मिळालेल्या वारली पेंटिंगच्या प्रशिक्षणामुळे आणि त्यांच्या महेनतीमुळे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अनुभव इंदू पवार यांचाच नसून त्यांच्यासह काम करणाऱ्या अनेक महिलांचा आहे.  रायगड जिल्ह्य़ातील जनशिक्षण संस्था आणि ट्रायफेडच्या माध्यमातून लोधीवली परिसरातील आदिवासी वाडय़ावरील महिलांना एकत्र करून वारली पेंटिंगचे प्रशिक्षण दिले आहे. १६ ते ७० वयोगटातील आदिवासी निरक्षर महिलांना एकत्र करून त्यांना त्यांच्या पारंपरिक कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. याचे चांगले परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना हाती पेन्सील धरता येत नव्हती त्या आता चांगली चित्रे काढयला शिकल्या आहेत.
या महिलांना वारली पेंटिंगचे प्राथमिक शिक्षण संजय सांगळे यांनी दिले तर गुजरातमधील आंतरराष्ट्रीय चित्रकार अरविंद घोसाळकर यांनी त्यांना अ‍ॅडव्हान्स ट्रेनिंग दिले आहे. या प्रशिक्षणानंतर या महिलांमधील आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्या चांगली चित्रे काढायला लागल्याचे जनशिक्षण संस्थेच्या संचालिका ज्योती लांडगे यांनी सांगितले.
 लोधीवली येथील या महिलांनी तयार केलेली सर्व वारली पेंटिंग्ज ट्रायफेडच्या माध्यमातून लवकरच विकत घेतली जाणार आहेत. यामुळे आदिवासी महिलांना चांगली आर्थिक मदत होणार असल्याचे ट्रायफेडचे विभागीय व्यवस्थापक यशवंत गनविर यांनी सांगितले.
 लोधीवली येथील आदिवासी महिलांची वारली पेंटिंगमधील कामगिरीची दखल राष्ट्रीय आरोग्य अभियानाने घेतली आहे. राज्य सरकारच्या पुढाकाराने एनआरएचएम अंतर्गत आता या महिलांना आता आरोग्य विषयक चित्र काढण्यास सांगण्यात आले आहे. ही चित्रे शासनाच्या कॅलेंडरमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहेत. यातूनही महिलांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. लोधीवलीच्या या महिलांचा आदर्श राज्यातील इतर भागातील आदिवासी महिलांनी घेतला तर त्यांचाही आर्थिक स्थर उंचावण्यास मदत होईल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग
43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी