शरद पवार हे जाणते राजेच आहेत असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. एवढंच नाही तर शरद पवारांना जाणते राजे अशी उपाधी का दिली जाते? याचंही स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. शिवाय, जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसेच अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाईनमध्ये आलेले आहेत, असा टोला देखील त्यांनी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना लगावला आहे.

“होय शरद पवार म्हणजे जाणता राजाच, हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजेच शरद पवार. इथला पाणीप्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, नागरी वस्तीमधील प्रश्न, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न अशी प्रश्नांची मालिका सांगा, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नांच उत्तर शरद पवारांकडे आहे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. म्हणून काहीजण सांगतात की त्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. जसे अनेकजण त्यांच्या करंगळीचा वापर करून राजकारणात आलेले आहेत. तसे अनेकजण त्यांच्यावर टीका करून हेडलाइनमध्ये आलेले आहेत. तेव्हा होय ते जाणते राजेच आहेत, तो जाणता राजाच आहे. अगोदर महिलांना ३० टक्के आरक्षण नंतर महिलांना ५० टक्के आरक्षण, मराठवाडा विद्यापीठास आंबेडकरांच नामकरण करणं, कोकण रेल्वे, जेएनपीटी असे अनेक प्रकल्प आहेत. महाराष्ट्राच्या गेल्या ६० वर्षांच्या सर्वांगीण विकासात सर्वाधिक वाटा जर कुणाचा असेल तर तो शरद पवार यांचाच आहे. होय म्हणूनच ते जाणते राजे आहेत.” असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

sharad pawar replied to narendra modi
नरेंद्र मोदींच्या ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यांचे म्हणणं खरं आहे, पण…”
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

आणखी वाचा – ‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते उदयनराजे भासले यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असा टोला उदयनराजेंनी पवारांचे नाव न घेता लगावला होता. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन सुरु असणाऱ्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी आज पुण्यात पत्रकारपरिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली आहे.