आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आपली ताकद दाखवण्यासाठी सध्या सर्वच उमेदवार मोठय़ा प्रमाणात भाडय़ाने कार्यकर्ते घेत प्रचार करत असताना चेंबूर परिसरात एक अपक्ष उमेदवार थाळी वाजवून (दवंडी पिटवून) लोकांना मतदान करण्याची साद घालत आहे. हा उमेदवार एकटाच फिरून प्रचार करत असल्याने सध्या तो चेंबूर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

सतीश सोनावणे (वय ५१) असे या अपक्ष उमेदवाराचे नाव असून ते चेंबूरच्या घाटले गाव येथे वास्तव्यास आहेत.  वेल्डिंगची कामे करणारे सोनावणे अवघे चौथी पास आहेत. मात्र समाजातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे, हा त्यांचा मूळ उद्देश आहे.  सोनावणे यांनी स्वत:चे पत्रकदेखील छापलेले नाहीत. केवळ एका हातात थाळी आणि दुसऱ्या हातात पळी घेऊन ते नाक्या-नाक्यावर जात दवंडी पिटून प्रचार करतात. सध्या समाजमाध्यमावर त्यांच्या प्रचाराची मोठी चर्चा आहे. अनेक जण त्यांच्या प्रचारावर हसतदेखील हसतात. मात्र मला त्याचे दु:ख वाटत नाही. मला समाज्यासाठी जे काही योग्य करता येईल, ते मी करतच राहणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Buldhana lok sabha, Buldhana,
बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!
Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
Mahayuti candidate Rajshree Hemant Patil took the accident victim to hospital in middle of night
यवतमाळ : मध्यरात्री अपघातग्रस्तास घेवून महायुतीच्या उमेदवार दवाखान्यात
Awaiting declaration for Lok Sabha election of three candidates from Ratnagiri Satara Thane Mumbai
महायुतीमधील पेच कायमच; रत्नागिरी, सातारा, ठाणे, मुंबईतील तीन उमेदवारांच्या घोषणेची प्रतीक्षा